शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुद्धे, तर शिवसेनेचे अनिल शिंदे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 11:07 IST

सर्वसाधारण गटातून अनिल शिंदे व येवले या दोघा शिवसेनेच्या नगरसेवकांतच लढत होती, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुद्धे व शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्यात लढत होती.

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या महापालिका क्षेत्रातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुद्धे व शिवसेनेचे अनिल शिंदे मताधिक्याने विजयी झाले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या एकूण पाच जागांसाठी निवडणूक होती. यापूर्वी महापालिकेतील एका जागेसह तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

सर्वसाधारण गटातून अनिल शिंदे व येवले या दोघा शिवसेनेच्या नगरसेवकांतच लढत होती, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुद्धे व शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्यात लढत होती. या निवडणुकीत एकूण 67 नगरसेवकांना मतदानाचा हक्क होता. सर्व 67 मतदारांनी मतदान केले . दोन्ही ठिकाणी दोनच उमेदवार असल्याने पसंती क्रम पद्धतीनुसार पहिल्या पसंतीची मते ज्या उमेदवाराला अधिक मिळतील तो विजयी होणार होता.

गुरुवारी सकाळी येथील महासैनिक लॉन येथे झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीचे पाऊलबुद्धे यांना 48 तर शिवसेनेच्या जाधव यांना 15 मते मिळाली. येथील चार मते बाद झाली. दुसरीकडे शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत झालेल्या लढतीत शिंदे यांना तब्बल 52 मते, तर येवले यांना दहा मते मिळाली. येथे पाच मते बाद झाली.विनीत पाऊलबुद्धे यांना राष्ट्रवादीसह भाजप, इतर पक्ष तसेच शिवसेनेच्याही एका गटाने मदत केल्याचे दिसते आहे. दुसरीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्याने येवले यांना फटका बसला. शिवसेनेचे शिंदे मात्र राष्ट्रवादी, भाजप व इतर नगरसेवकांच्या मदतीने सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याचे निकालातून स्पष्ट होते.