ब्राह्मणीतील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:43+5:302021-09-09T04:25:43+5:30

दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवासी प्रवास करतात. ओढा अरुंद झाला आहे. परिणामी, जोरदार पाऊस ...

The nature of the stream to the road in Brahmani | ब्राह्मणीतील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

ब्राह्मणीतील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवासी प्रवास करतात. ओढा अरुंद झाला आहे. परिणामी, जोरदार पाऊस पडल्यास ओढ्याचे पाणी परिसरातील शेतात शिरते. शेतातील पाणी रस्त्यावर येते. याच रस्त्याच्या कडेला जिल्हा परिषद प्राथमिकची वस्ती शाळा आहे. दरवर्षी रस्त्यावरून पाणी शाळेत शिरते. अनेक दिवस शाळेभोवती पाणी साचून राहते.

महत्त्वाच्या प्रश्नाकडे वेळीच लक्ष न दिल्याने दरवर्षी हा प्रश्न जणू नित्याची बाब बनून पुढे येतो. तरी या महत्त्वाच्या प्रश्नाला ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

..............

ओढा उकरून पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे गरजेचे आहे. दरवर्षी ओढ्याचे पाणी रस्त्यावर येते. यापूर्वी तहसीलदार यांनी समक्ष पाहणी केली. मात्र पुढे कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रश्न कायम आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शाळेला धोका निर्माण होऊ शकतो.

- डॉ. राजेंद्र बानकर,

माजी उपसरपंच

.............

घटनास्थळाची गुरुवारी पाहणी करणार आहे. शाळेपुढे ग्रामपंचायतीमार्फत मुरूम टाकणार असून, ओढ्याच्या प्रवाहाबाबत स्थळ पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल.

- संदीप नेहरकर, तलाठी, ब्राह्मणी

Web Title: The nature of the stream to the road in Brahmani