शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

शेताला आले तळ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST

एक महिना पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. घास, कपाशी, वांगी, ...

एक महिना पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. घास, कपाशी, वांगी, ऊस आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पीक जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. यंदा समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. एक महिना पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले होते. मात्र, खंड पडल्यानंतर पावसाने जोरदार मुसंडी घेतली होती. त्यामुळे वारंवार पडणाऱ्या पावसामुळे शेतातील उभी पिके पिवळी पडू लागली आहेत. पिकाच्या मुळ्या कुजू लागल्या आहेत. शेतातील पाणी काढून देण्यासाठी चर राहिले नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतमालाला भाव नाही. चारा पिकांवर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहेत. मात्र, चारा पिके ही कुजू लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

...............

दोन एकर वांग्याची लागवड केली आहे. सुमारे एक ते सव्वा लाखाच्या आसपास खर्च झाला आहे. सध्या वांग्याचा तोडा सुरू आहे. लाखो रुपये खर्च करून झालेला खर्च निघणे मुश्किल झाले आहे. शासनाने तातडीने पीक पाहणी करून पंचनामे करावेत. नुकसानभरपाई द्यावी.

- अजय भांड, वांगी उत्पादक, शेतकरी

070921\20210907_081150.jpg

अति पावसामुळे शेतातील उभी पिके संकटात ,शेताला आले तळ्याचे स्वरूप