शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या ‘उमंग’ला नगरकरांचा प्रतिसाद

By admin | Updated: August 24, 2014 02:06 IST

अहमदनगर : ‘लोकमत’तर्फे ‘जागतिक छायाचित्र दिना’च्या निमित्ताने आयोजित छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाला शनिवारी प्रारंभाच्या दिवशीच नगरकर रसिकांनी प्रतिसाद दिला.

अहमदनगर : ‘लोकमत’तर्फे ‘जागतिक छायाचित्र दिना’च्या निमित्ताने आयोजित छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाला शनिवारी प्रारंभाच्या दिवशीच नगरकर रसिकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, रविवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. नगर-पुणे महामार्गावरील ओम गार्डन येथे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करुन प्रदर्शनाचा प्रारंभ झाला. यावेळी मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या नगर शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, सुप्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र फिरोदिया, श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कॉ-आॅप अर्बन क्रेडीट सोसायटीचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे, ओम उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब पवार, नगरसेविका सुवर्णा जाधव, समर्थ डिजीटल लॅबचे नरेश कांबळे, वृत्तछायाचित्रकार राजू शेख, दत्ता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी ‘लोकमत’च्या या प्रयत्नांचे स्वागत केले. पारगावकर म्हणाले, छायाचित्रण कला आंतरबाह्य बदलली. नवे तंत्रज्ञान आले. मात्र उत्तम छायाचित्र काढण्यासाठी लागणारी कल्पकता नसेल, तर छायाचित्र सजीव होत नाही. प्रदर्शनातील अनेक छायाचित्रे अशीच मनोवेधक आहेत. छायाचित्र विक्रीच्या देणगीतून सामाजिक संस्थेच्या मदतीचा हेतू स्वागतार्ह आहे. नरेंद्र फिरोदिया यांनीही सहभागी छायाचित्रांना मनापासून दाद दिली. ते म्हणाले, नगर शहर आणि आजुबाजूच्या परिसराचे वैभव या छायाचित्रांमधून नजरेत भरते. या प्रदर्शनाला असलेला सामाजिक दृष्टीकोन त्याचे महत्व अधोरेखित करणारा आहे. यावेळी त्यांनी छायाचित्रे खरेदी करुन छायाचित्रकरांचा उत्साह वाढविला. दरम्यान, दिवसभर छायाचित्र रसिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन छायाचित्रकारांचा उत्साह वाढविला. रविवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)