शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

नागवडे अपक्ष आमदार होऊ शकतात-सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 13:37 IST

श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागवडे या अपक्ष आमदार होऊ शकतात. परंतु त्यांचा निवडून आल्यानंतर काही उपयोग होणार नाही. कारण मला पक्षाचेच काम करावे लागेल, असे सांगत खासदार सुजय विखे यांनी अप्रत्यक्षपणे नागवडे यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे. 

अहमदनगर : श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागवडे या अपक्ष आमदार होऊ शकतात. परंतु त्यांचा निवडून आल्यानंतर काही उपयोग होणार नाही. कारण मला पक्षाचेच काम करावे लागेल, असे सांगत खासदार सुजय विखे यांनी अप्रत्यक्षपणे नागवडे यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे. श्रीगोंदा येथे शनिवारी नागवडे समर्थकांच्या मेळाव्यात विखे यांनी हे वक्त्यव्य केले. श्रीगोंद्यातून भाजपची उमेदवारी बबनराव पाचपुते यांना मिळाली आहे. असे असताना नागवडे या अपक्ष आमदार होऊ शकतात, असे वक्त्यव्य विखे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसच्या काळात एबी फॉर्म माझ्या गाडीत असायचे. पण, भाजप हा पक्ष असा आहे की जेथे गडबडी होत नाहीत, असेही ते म्हणाले. दरम्यान पाचपुते व आमचे जमत नाही पण मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यास काही कटू निर्णय घेऊ शकतो, असे राजेंद्र नागवडे यावेळी बोलताना म्हणाले. त्यामुळे नागवडे काय भूमिका घेणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे. विखे हे पाचपुते यांच्या उमेदवारीला अनुकूल नव्हते असा संदेश सुजय विखे यांच्या विधानातून गेला आहे. नागवडे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी विखे हे सुरूवातीपासून प्रयत्नशील होते. त्यामुळे विखे-नागवडे हे पाचपुते यांना मनापासून साथ देणार का? ही शंका उपस्थित होत आहे. पाचपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादीने ऐनवेळी घनशाम शेलार यांना उमेदवारी दिली आहे. शेलार हे काही महिन्यापूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले. ते आता निवडणुकीची कशी तयारी करणार यावर राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून आहे. श्रीगोंदा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस यांनी पाचपुते यांच्या घरासमोर ऊस दरासाठी दोन महिन्यापासून आंदोलन सुरू केले असून तेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी सर्व प्रस्थापितांवर हल्लाबोल सुरू केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील मतदारही संभ्रमात आहेत. तालुक्यात लढत नक्की कोणात होणार? हे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019