शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रभाषेच्या प्रसारासाठी मुळे यांचे कार्य अनमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST

अहमदनगर : हिंदी या राष्ट्रभाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रा. मधुसूदन मुळे यांनी केलेले काम अनमोल आहे. देशाच्या दक्षिण ...

अहमदनगर : हिंदी या राष्ट्रभाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रा. मधुसूदन मुळे यांनी केलेले काम अनमोल आहे. देशाच्या दक्षिण भागात हिंदी चांगली रुजविली असती तर देशाचे चित्र आणखी वेगळे दिसले असते, असे प्रतिपादन राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.

येथील प्रा. मुळे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्य साधून त्यांनी लिहिलेल्या ‘खमंग चणे-फुटाणे’, ‘जिव्हाळा’ आणि ‘हिंद सेवक’ या पुस्तकांचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डाॅ. अनिल सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ उद्योजक श्रीकृष्ण जोशी, पंडित दीनदयाळ पतसंसस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा, प्रेमा मुळे उपस्थित होते. वेदमूर्ती नीलेश धर्माधिकारी आणि किशोर जोशी यांनी वेदमंत्र पठण केले. पल्लवी देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी पवार पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमधून मुळे यांचा जीवनमार्ग प्रशस्त झाला. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्या सहवासामधून प्रा. मुळे यांची राजकीय विचारधारा पक्की झाली. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, अर्थकारण अशा विविध क्षेत्रांत मुळे यांच्याकडून होत असलेले मार्गदर्शन आदर्शवत आहे. अंतर्मनाच्या प्रेरणेमधूनच राष्ट्र व समाजाची उभारणी करता येते. ब्रिटिश आपला देश सोडून गेल्यापासून आजतागायत आपण राष्ट्र उभारणीचे, समाज उभारणीचे शिक्षण देऊ शकलो नाही, याची खंत वाटते.

प्रा. डाॅ. अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले, निष्ठावंत सेवक, निष्ठावंत लेखक, निष्ठावंत कवी असे त्रिविध प्रकारचे व्यक्तिमत्त्व या तीन पुस्तकांमधून समोर आले आहे. अपमान गिळण्याची ताकद असणाराच मोठा होत असतो. देवपण टाकीचे घाव सोसल्यानंतरच येते. जिव्हाळा या लेखसंग्रहातून वैद्यकीय क्षेत्रात आत्मपरीक्षण घडेल, असा विश्वास वाटतो. जया जोशी व माधव जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. भारती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा नाईक यांनी आभार मानले.

-----------

फोटो-०५ मधुसूदन मुळे

प्रा. मधुसूदन मुळे यांच्या ‘खमंग चणे-फुटाणे’, ‘जिव्हाळा’ आणि ‘हिंद सेवक’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. डाॅ. अनिल सहस्त्रबुद्धे, श्रीकृष्ण जोशी, वसंत लोढा व प्रेमा मुळे आदी.