शेवगाव-पाथर्डीतून पुन्हा मोनिका राजळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:42 IST2019-10-01T14:06:21+5:302019-10-01T14:42:22+5:30

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपने पुन्हा मोनिका राजळे यांना उमेदवारी देत बंडोबांना धक्का दिला आहे. 

Monica Rajale again through Shegaon-Pathardi | शेवगाव-पाथर्डीतून पुन्हा मोनिका राजळे

शेवगाव-पाथर्डीतून पुन्हा मोनिका राजळे

शेवगाव/पाथर्डी : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपने पुन्हा मोनिका राजळे यांना उमेदवारी देत बंडोबांना धक्का दिला आहे. 
शेवगाव-पाथर्डीतून गतवेळी मोनिका राजळे या विजयी झाल्या. मतदारसंघात त्यांचा संपर्क असल्याने याहीवेळी त्याच उमेदवारीच्या प्रमुख दावेदार होत्या. मात्र पक्षातील काही कार्यकर्त्यांनी व विखे समर्थकांनी त्यांच्या गटाला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. हर्षदा काकडेही या गटात सहभागी होत्या. या विरोधी गटाने मेळावाही घेतला होता. मोनिका राजळे यांनी विरोधकांना काहीही प्रत्युत्तर दिले नव्हते. भाजपने पहिल्याच यादीत राजळे यांचे नाव जाहीर केल्याने या मतदारसंघातील चर्चा आता संपुष्टात आली आहे. राजळे यांची उमेदवारी झाल्यानंतर समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. राष्टवादीकडून आता उमेदवारी कोणाला याची प्रतीक्षा आहे. 

Web Title: Monica Rajale again through Shegaon-Pathardi