शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
4
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
5
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
6
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
7
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
8
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
9
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
10
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
11
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
12
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
13
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
14
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
15
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
16
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
17
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
18
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
19
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
20
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरच्या कुख्यात टोळीविरुद्ध ‘मोक्का’

By admin | Updated: August 17, 2014 00:04 IST

अहमदनगर : पारनेर तालुक्यात टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

अहमदनगर : पारनेर तालुक्यात खून, दरोडे, खुनाचा प्रयत्न, दुखापत करून दहशत बसविणे आणि पैसे कमविणाऱ्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. या टोळीविरुद्ध जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात १२ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज येथील हॉटेल मंथन येथे शरद उर्फ गौरव रघुनाथ पवार (रा. निघोज, ता. पारनेर)यास २० जणांच्या टोळीने शिवीगाळ,दमदाटी करून तसेच तलवारीने डोक्यावर, हातावर मारून, डोक्यावर काचेच्या बाटल्या मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यावरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विकास आनंदा रसाळ याच्या सांगण्यावरून ही मारहाण झाल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात प्रवीण आनंदा रसाळ हा टोळीचा प्रमुख आहे. तो गुंडांच्या मदतीने पारनेर, शिरूर आणि परिसरात दहशत बसवून आर्थिक फायद्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत, मारामारी करणे यासारखे गुन्हे करून त्यातून अमाप पैसा जमा करीत आहे. या दहशतीच्या जोरावर अवैध वाळू उपसा करीत आहेत. या टोळीवर २००७ पासून आतापर्यंत एक खून, दोन खुनाचे प्रयत्न, अनेक दंगलीचे असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. टोळीप्रमुख प्रवीण रसाळवर खून, खुनाचा प्रयत्न व अनेक दंगलीचे १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाईबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या परवानगीने ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले. तसे आदेशच स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोणत्याही गुंडांची दादागिरी चालू द्यावयाची नाही. त्या गुंडांवर, तसेच त्याच्या पाठीराख्यावरही मोक्का, तडीपारीच्या कारवाया करून गुंडगिरीचे उच्चाटन करण्याबाबत गौतम यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. या टोळीचा प्रमुख प्रवीण रसाळ हा कुख्यात गुंड असून, वाळू तस्कर म्हणून त्याची तालुक्यात दहशत आहे. मोक्काच्या कारवाईमुळे या टोळीच्या गुन्हेगारीवर प्रतिबंध येईल.
(प्रतिनिधी)