मनसेचे रस्त्यावर शेणाचा सडा देत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:44+5:302021-08-28T04:24:44+5:30
शहराध्यक्ष सतीश काकडे म्हणाले, शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यामध्ये नगरपालिकेने केवळ मुरुम टाकून डागडुजी केली आहे. त्याचा निषेध करत या ...

मनसेचे रस्त्यावर शेणाचा सडा देत आंदोलन
शहराध्यक्ष सतीश काकडे म्हणाले, शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यामध्ये नगरपालिकेने केवळ मुरुम टाकून डागडुजी केली आहे. त्याचा निषेध करत या रस्त्यावर शेणाचा सडा फुलांच्या पाकळ्या टाकून नगरपालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानत आहेत. यामुळे विकासकामांना खीळ बसत असून, लाखो रुपयांचा कर भरुनही शहरवासीयांना विविध समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शहरातील सर्वच रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे पालिका पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
या आंदोलनात उपशहराध्यक्ष अनिल गाडे, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, युवा नेते नवनाथ मोहिते, विक्रम काकडे, विकी चव्हाण, राजू भालेराव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
............
फोटोओळी -
कोपरगावात मनसेने रस्त्यावर शेणाचा सडा देत आंदोलन केले. ( छायाचित्र : संजय भवर )
.......
फोटो२७ - मनसे आंदोलन - कोपरगाव
270821\1542-img-20210827-wa0013.jpg
?????? - ???? ?????? - ???????