अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाचा मान पुन्हा एकदा महिलेला मिळणार आहे. मुंबईत शनिवारी झालेल्या सोडत आरक्षणात खुल्या प्रवर्गातील महिलेचे आरक्षण निघाले. दोन वर्ष अवधी असलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत रस्सीखेच होणार हे आजच निश्चित झाले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. राष्ट्रवादीने, काँग्रेस, मनसे व अपक्षांना सोबत घेत सत्ता काबीज केली. सत्ता स्थापन करताना ६८ नगरसेवकांपैकी ४० नगरसेवकांचे बलाबल झाले. विरोधी युतीकडे २८ चे बलाबल होते. जून २०१६ अखेर विद्यमान महापौर संग्राम जगताप यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यापुढचे आरक्षणाची सोडत मुंबईत शनिवारी निघाली. पुढचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघाले आहे. महिलेसाठी आरक्षण निघाल्याने युती व आघाडी दोघांकडेही सक्षम व तुल्यबळ उमेदवार आहे. त्यामुळे महिला महापौर पदाची निवडणूक होताना पुन्हा मनसे व अपक्षांना ‘मान’ मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी २०११ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण निघाले होते. (प्रतिनिधी)
पुन्हा होणार महिला महापौर
By admin | Updated: August 17, 2014 00:01 IST
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाचा मान पुन्हा एकदा महिलेला मिळणार आहे
पुन्हा होणार महिला महापौर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}