शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर

By admin | Updated: August 17, 2014 23:25 IST

अहमदनगर: लोकसभेची पुनर्वृत्ती विधानसभा निवडणुकीतही होईल, ही अपेक्षा ठेवून जिल्ह्यातील अनेक दिग्गज भाजपाच्या वाटेवर आहेत़

अहमदनगर: लोकसभेची पुनर्वृत्ती विधानसभा निवडणुकीतही होईल, ही अपेक्षा ठेवून जिल्ह्यातील अनेक दिग्गज भाजपाच्या वाटेवर आहेत़ केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी सोमवारी नगर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करण्याची अनेकांची सुप्त इच्छा आहे़ मात्र भाजपाने हा प्रवेश लांबणीवर टाकला आहे़ याविषयी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस यांच्याशी संपर्क साधला असता काहींचा प्रवेशाचा निर्णय झाला असून, काहींबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही़ पक्ष प्रवेशाचा वेगळा कार्यक्रम घेऊन प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे़ त्यामुळे अनेकांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत़लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे़ भाजपाच्या अध्यक्षपदी अमित शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ नियुक्ती नंतर शहा यांनी विधानसभा निवडणुकीची व्यहूरचना आखण्याचे काम हाती घेतले आहे़ पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी हा त्याचाच एक भाग आहे़ शहा यांनी नुकतीच भाजपाची कार्यकारिणी जाहीर केली़ या कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे़ भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नगर जिल्ह्यातील पक्षाचे प्रवक्ते श्याम जाजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्हा भाजपातही मोठी सफाई मोहीम होण्याची शक्यता आहे़ लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी सोमवारी नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत़ गडकरी यांच्या उपस्थित भाजपात अनेकजण भाजपात प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे़ याविषयीची राष्ट्रीय सरचिटणीस श्याम जाजू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षीय प्रवेशाचा स्पष्ट नकार केला आहे़ ते म्हणाले, आपणही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे, गडकरी यांच्या कार्यक्रमात कुणीही पक्षात प्रवेश करणार नाही़ भाजपात प्रवेश करण्यासाठी जिल्ह्यातील अनेकजण इच्छुक आहेत़ काहींना प्रवेश देण्याबाबत निर्णय झाला असून, काहींची चर्चा सुरू आहे़ पक्षात नव्याने येणाऱ्यांच्या प्रवेशासाठीचा वेगळा कार्यक्रम घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)