मेजर चौधरी यांचे एनसीसीतील कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:01+5:302021-07-18T04:16:01+5:30

अहमदनगर : मेजर डाॅ. संजय चौधरी यांनी राष्ट्रीय पातळीवर एनसीसी शिबिर व इतर एनसीसी कार्यक्रमांत केलेले कार्य उल्लेखनीय असून, ...

Major Chaudhary's work in NCC is remarkable | मेजर चौधरी यांचे एनसीसीतील कार्य उल्लेखनीय

मेजर चौधरी यांचे एनसीसीतील कार्य उल्लेखनीय

अहमदनगर : मेजर डाॅ. संजय चौधरी यांनी राष्ट्रीय पातळीवर एनसीसी शिबिर व इतर एनसीसी कार्यक्रमांत केलेले कार्य उल्लेखनीय असून, त्यांनी मिल्ट्री सायन्स एनसीसी संदर्भात केलेला अभ्यास हा एनसीसी संघटना व छात्र सैनिकांसाठी फायदेशीर होईल, असे गौरवोद्गार सतरा महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांनी काढले.

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील एनसीसी आर्मी सिनिअर डिव्हिजन विभागाचे प्रमुख मेजर डाॅ. संजय चौधरी यांना मिल्ट्री सायन्स विभागात पीएच.डी. मिळाल्याबद्दल झेंडे यांच्या हस्ते त्यांचा बटालियन हेडकॉटरमध्ये सत्कार करण्यात आला.

या वेळी ॲडम ऑफिसर कर्नल विनय बाली यांनी एनसीसी अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध विषयांवर संवाद केला. या कार्यक्रमाला कर्नल विनय बाली, कॅप्टन डॉ. सुरेश जाधव, लेफ्टनंट डॉ. अजय कुमार पालवे, लेफ्टनंट डॉ. माधव जाधव, प्रा. लेफ्टनंट भरत होळकर, लेफ्टनंट प्रा. सुभाष आगडे, लेफ्टनंट डॉ. सुनील फुलसुगवे, सुभेदार मेजर लोकेंद्र सिंग, सुभेदार शिवाजी जाधव, सुभेदार सतेदरसिंग, सुभेदार कुंदन आदी उपस्थित होते. डाॅ. चौधरी यांच्या यशाबद्दल आमदार रोहित पवार, राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, काकासाहेब निंबाळकर, बप्पाजी धांडे, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, गणेश वामन, शंकर मैना, सतीश गांगर्डे, विष्णू शिंदे यांनी कौतुक केले.

------------

फोटो - १७चौधरी सत्कार

दादा पाटील महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे प्रमुख मेजर डाॅ. संजय चौधरी यांना मिल्ट्री सायन्स विभागात पीएच.डी. मिळाल्याबद्दल सतरा महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांनी त्यांचा सत्कार केला.

Web Title: Major Chaudhary's work in NCC is remarkable