आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ‘रुसवा’ला स्थान

By Admin | Updated: December 16, 2015 23:07 IST2015-12-16T22:32:46+5:302015-12-16T23:07:19+5:30

अहमदनगर : दिल्ली येथे फर्स्ट इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात येथील चित्रकार प्रमोद जगताप यांच्या रुसवा या चित्राची निवड झाली होती़

Location of 'Rovers' in International Exhibition | आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ‘रुसवा’ला स्थान

आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ‘रुसवा’ला स्थान

अहमदनगर : दिल्ली येथे फर्स्ट इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात येथील चित्रकार प्रमोद जगताप यांच्या रुसवा या चित्राची निवड झाली होती़ या प्रदर्शनात जगभरातील ३८ देशातील चित्रकारांनी सहभाग घेतला होता़ त्यात भारतातून अवघ्या ४० चित्रकारांच्या चित्रांची निवड करण्यात आली़ या प्रदर्शनात ५० फूट लांबीचे जगातील सर्वांत मोठे जलरंग चित्र तयार करण्यात आले होते़ यामध्ये जगताप यांनी सहभाग नोंदविला़ या प्रदर्शनात वॉटर कलर सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष चित्रकार अमित कपूर यांनी जगताप यांना
प्रमाणपत्र देऊन सन्मानित
केले़

Web Title: Location of 'Rovers' in International Exhibition