शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचे सीमोल्लंघन

By admin | Updated: October 3, 2014 23:55 IST

अहमदनगर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या मुहूर्तावर शुक्रवारी नगरकरांची सोने, चांदी, कपडे, गृहोपयोगी वस्तू व वाहन खरेदीसाठी झुंबड उडाली़

अहमदनगर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या मुहूर्तावर शुक्रवारी नगरकरांची सोने, चांदी, कपडे, गृहोपयोगी वस्तू व वाहन खरेदीसाठी झुंबड उडाली़ नगरमध्ये वाहन खरेदीतून सर्वाधिक ३० कोटी रुपयांची तर सोने-चांदी खरेदीतून सुमारे आठ कोटी रुपयांची उलाढाल झाली़ इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचीही सुमारे एक कोटीच्या घरात खरेदी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़विजयादशमीच्या दिवशी सकाळी शस्त्र पूजन झाल्यानंतर घटउत्थापन करण्यात आले़ त्यानिमित्त केडगाव, बोल्हेगाव, दिल्ली गेट येथे शमीपूजन करण्यात आले़ तसेच विविध ठिकाणी सार्वजनिक स्तरावर शस्त्र पूजनाचे कार्यक्रमही झाले़ दुपारनंतर नगरकरांनी सोने, चांदी, गृहपयोगी वस्तू, वाहन खरेदीसाठी गर्दी केली़ अनेकांनी वाहनांची आगाऊ नोंदणी केली होती़ आगाऊ वाहन नोंदणी केलेल्या तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी आलेल्या नगरकरांना रात्री उशीरापर्यंत वाहनांचे वितरण करण्यात येत होते़ तथापि, महागडी वाहने आगाऊ नोंदणी करुनही न मिळाल्याने काहींना नाराजी पत्करावी लागली़ दुचाकी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती़ वाहन खरेदीतून सुमारे ३० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले़सोने, चांदीच्या खरेदीसाठी दुपारनंतर चांगली गर्दी झाली़ शुद्ध सोन्याला दिवसभरात मोठी मागणी राहिली़ तथापि, तयार दागिने खरेदी करण्याकडे गृहिणींचा कल दिसून आला़ अनेक ज्वेलर्सनी भेटवस्तुंची योजना सुरु केल्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी तेजीत राहिली़ चांदीची भांडी आणि नाणे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले़ सोने-चांदी खरेदीतून दिवसभरात सुमारे ८ कोटींची उलाढाल झाली़ कापड खरेदीसाठी गेले दोन दिवस मोठी गर्दी झाली होती़ यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली़ मात्र, दसऱ्याच्या मुहूर्तावर अपेक्षित खरेदी झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़ तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या खरेदीसाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली़ दिवसभरात एलईडी टीव्ही व फ्रिज खरेदी करण्याकडे चांगला कल राहिला़ यातून दिवसरात सुमारे १ कोटी रुपयांची उलाढाल झाली़ गृहखरेदीसाठीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला़ गृहप्रकल्पांच्या साईटवर जाऊन अनेकांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर घराची नोंदणी केली़ यातून कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे डेव्हलपर्सकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)