कोरोनाची महामारी जाऊ द्या; सारे विश्व सुखी होऊ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST2020-12-30T04:28:15+5:302020-12-30T04:28:15+5:30

नेवासा : श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयांचा जयघोष करीत सायंकाळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत ...

Let the epidemic of Corona go; Let the whole world be happy | कोरोनाची महामारी जाऊ द्या; सारे विश्व सुखी होऊ द्या

कोरोनाची महामारी जाऊ द्या; सारे विश्व सुखी होऊ द्या

नेवासा : श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयांचा जयघोष करीत सायंकाळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या, सारे विश्व सुखी होऊ द्या, असे साकडे दत्त जन्मप्रसंगी महंत भास्करगिरी महाराजांनी भगवान दत्तात्रयांना घातले.

यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने श्रीक्षेत्र देवगड मंदिर प्रांगणात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रीदत्त जयंतीनिमित्त पहाटे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची विधिवत पूजन करून अभिषेक करण्यात आला. सकाळी मंदिर प्रांगणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या पालखी रथात श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरी बाबांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. दुपारी दत्त यागाचे पूजन करून होम कुंडात श्रीफळ अर्पण करण्यात येऊन पूर्णाहुती देण्यात येऊन सांगता करण्यात आली. सायंकाळी झालेल्या दत्त जन्म सोहळ्याप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, महंत योगी ऋषिनाथ महाराज यांच्या हस्ते दत्तजन्म पाळणा दोरी ओढण्यात आली. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मातोश्री सरूबाई पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धनश्री विखे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी सरपंच अजय साबळे, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, किरणराव धुमाळ, बजरंग विधाते, राम विधाते यांच्यासह संत- महंत उपस्थित होते. मंगळवारी सकाळपासूनच प्रवरासंगम, देवगड फाटा, नेवासा येथून देवगडकडे जाणारे रस्ते ओस पडलेले दिसत होते. नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

.............

श्रीदत्त जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र देवगड येथे दत्त जन्म सोहळ्याप्रसंगी पाळणा दोरी ओढताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित भाविक. (छायाचित्र- सुहास पठाडे)

Web Title: Let the epidemic of Corona go; Let the whole world be happy