शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आल्यानंतर एलबीटी हद्दपार

By admin | Updated: October 2, 2014 00:33 IST

अहमदनगर : भाजपाचे सरकार आल्यानंतर राज्यातून एलबीटी हद्दपार करू, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिले.

अहमदनगर : आघाडी सरकारने शहरांकडे पैसे कमविण्याचे मशिन म्हणून पाहिले. त्यामुळेच राज्यातील शहरे बकाल झाली आहेत. जकात रद्द करून मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर एलबीटीचे भूत बसविले. त्यांच्या ‘इगो’मुळे एलबीटी रद्द झाला नाही. भाजपाचे सरकार आल्यानंतर राज्यातून एलबीटी हद्दपार करू, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिले.भाजपाचे नगर शहर मतदारसंघातील उमेद्वार अ‍ॅड. अभय आगरकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, संघटन मंत्री विठ्ठल चाटे, सुनील रामदासी आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर नगर शहराच्या विकास आराखड्यासाठी राज्य आणि केंद्राकडून पैसा उपलब्ध करून दिला जाईल. परदेशातील गुंतवणूकही नगरमध्ये आणता येईल. पिण्याच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे आॅडिट होईल. उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराला चालना देऊन शहराची दुरावस्था बदलण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नगरच्या तरुणांना रोजगारासाठी पुणे-मुंबईला जावे लागले. त्यामुळे नगर पेन्शनरांचे शहर झाले आहे. शिक्षण हा हजारो कोटी रुपयांचा उद्योग बनला आहे. महर्षी गेले आता डिग्रीचे कारखाने काढून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सम्राट झाले आहेत.साठ वर्षे ज्यांनी देशाला लुटले ते शंभर दिवसांचा हिशेब मागत आहेत. आघाडी सरकारने राज्याला फक्त बेरोजगारी, गुन्हेगारी आणि आत्महत्या दिल्या आहेत. मोदी सरकार आल्यापासून महगाईवर काबू ठेवण्यात यश आले आहे. जगाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता असलेला पंतप्रधान देशाला मिळाला आहे, असे सांगून फडवणीस यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारचे व्हीजन सविस्तरपणे मांडले. (प्रतिनिधी)काँग्रेस ‘लुना पार्टी’ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडताना राष्ट्रवादी काँग्रेस नॅनो पार्टी होईल, असे भाकित फडणवीस यांनी नगरमध्ये केले होते. त्याची आठवण सांगताना फडणवीस म्हणाले, नगरमध्ये जे बोलले जाते ते खरे होते. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेत इनोव्हाची ‘नॅनो पार्टी’ झाली, तर काँग्रेस ‘लुना पार्टी’झाली. आता नगरचा आमदारही भाजपाचाच असेल.