लहारेवस्ती जि. प. शाळेस दोन प्रोजेक्टर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST2021-08-17T04:27:12+5:302021-08-17T04:27:12+5:30

शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील शिक्षक बालाजी दिवटे व चांगदेव डोंगरे यांच्या सहकार्याने शाळेने अनेक पुरस्कार मिळवलेले ...

Laharevasti Dist. W. Two projectors visit the school | लहारेवस्ती जि. प. शाळेस दोन प्रोजेक्टर भेट

लहारेवस्ती जि. प. शाळेस दोन प्रोजेक्टर भेट

शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील शिक्षक बालाजी दिवटे व चांगदेव डोंगरे यांच्या सहकार्याने शाळेने अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. कोरोना काळातही योग्य ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यासक्रमाचे नियोजन केले. युनियन बँकेतील अधिकारी व शाळेचे माजी विद्यार्थी गंगाधर घाडगे यांनी शाळेविषयी व गुरूविषयी कृतज्ञता म्हणून स्वातंत्र्यदिनी शाळेला डिजिटल शिक्षणासाठी दोन प्रोजेक्टर संच भेट दिले.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट लहारे, कैलास लहारे, लता लहारे, भास्कर लहारे, पोपट लहारे, सोन्याबापू लहारे, गंगाधर घाडगे, साहेबराव पगारे, विजय शेळके, वाल्मिक लहारे, सागर एनगे, अतुल एलम, पोपट खरात, भाऊसाहेब लहारे, इंद्रभान एनगे, लक्ष्मीबाई सोनवणे, विमल शिरगिरे, प्रमोद एलम, अमोल लहारे व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक चांगदेव डोंगरे यांनी केले, तर आभार बालाजी दिवटे यांनी मानले.

--------

फोटो - १६लहारेवस्ती स्कूल

राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद लहारेवस्ती या उपक्रमशील शाळेला माजी विद्यार्थी गंगाधर घाडगे यांनी दोन प्रोजेक्टर भेट दिले.

Web Title: Laharevasti Dist. W. Two projectors visit the school