कोरठण खंडोबा यात्रा साध्या पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:48+5:302021-02-05T06:34:48+5:30

अळकुटी : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रेच्या शेवटच्या व मुख्य दिवशी परंपरेप्रमाणे ...

Korthan Khandoba Yatra in a simple way | कोरठण खंडोबा यात्रा साध्या पद्धतीने

कोरठण खंडोबा यात्रा साध्या पद्धतीने

अळकुटी : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रेच्या शेवटच्या व मुख्य दिवशी परंपरेप्रमाणे बेल्हे व ब्राह्मणवाडा येथील मानाच्या काठ्यांच्या शासकीय महापूजेनंतर या काठ्यांनी खंडोबाचे कळस व देवदर्शन घेतले. यंदा यात्रा साधेपणाने साजरी झाली. यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांनी खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर कोरठण खंडोबा देवस्थानच्या यात्रा निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.

पहाटे पाच वाजता खंडोबाचे चांदीचे सिंहासन व उत्सव मूर्तींना साजशृंगार करण्यात आल्यानंतर अक्षय येवले या दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. यानंतर स. ६. ३० वाजता पोलीस उपनिरीक्षक शंकर राजपूत यांच्या हस्ते खंडोबाची महाआरती, अभिषेक, महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड, अरुण कुलकर्णी, रामदास मुळे, सुरेश सुपेकर, विश्वस्त अमर गुंजाळ, ज्ञानदेव पुजारी, देवीदास व दत्तात्रय क्षीरसागर, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Korthan Khandoba Yatra in a simple way