आॅनलाइन लोकमतकोपरगाव (अहमदनगर), दि़ २९ - कोपरगाव नगर पालिकेच्या पाणी नियोजन विशेष बैठकीत नगरसेवक व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यात शनिवारी सकाळी जोरदार वादावादी, खडाजंगी झाली़शनिवारी सकाळी नगर पालिकेच्या सभागृहात पाणी नियोजनासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती़ या नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरु झाली़ मात्र, काही वेळातच पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत अधिकाऱ्यांवर टीका केली़ त्यावरुन अधिकारी-पदाधिकारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली़ त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकून सभात्याग केला. नगराध्यक्ष विजय वहाडणे हताश होऊन हा सारा प्रकार पहात होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}