आईच्या कुशीतून १६ दिवसाच्या बालिकेचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:23 IST2021-09-26T04:23:55+5:302021-09-26T04:23:55+5:30

श्रीरामपूर येथून रोजगारासाठी आलेले सुनील कपिले व त्यांची पत्नी सुनीता हे दाम्पत्य शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे क्वाॅर्टरजवळ राहतात. ...

Kidnapping of a 16-day-old girl from her mother's arms | आईच्या कुशीतून १६ दिवसाच्या बालिकेचे अपहरण

आईच्या कुशीतून १६ दिवसाच्या बालिकेचे अपहरण

श्रीरामपूर येथून रोजगारासाठी आलेले सुनील कपिले व त्यांची पत्नी सुनीता हे दाम्पत्य शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे क्वाॅर्टरजवळ राहतात. ३ सप्टेंबर रोजी या दाम्पत्याला मुलगी झाली. तिचे श्रावणी असे त्यांनी नाव ठेवले. कन्यारत्न झाल्याने पती-पत्नी आनंदात होते. मात्र त्यांच्या आनंदाला २० सप्टेंबर रोजी रात्री ग्रहण लागले. रात्री जेवण करून सुनीता या १६ दिवसाच्या श्रावणीला कुशीत घेऊन झोपल्या. त्या गाढ झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने श्रावणीला पळवून नेले. सुनील व सुनीता जागे झाले तेव्हा त्यांना श्रावणी दिसली नाही. त्यांनी तिचा इतरत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. त्यानंतर दोन दिवस या दाम्पत्याने श्रावणीचा शोध घेतला, मात्र ती मिळून न आल्याने पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे पुढील तपास करीत आहेत.

--------------------------

पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन

अपहरण झालेल्या श्रावणीचा रंग गोरा, चेहरा उभट, अंगात पिवळ्या रंगाचा कपडा व टोपी असे वर्णन आहे. सदर बालिकेबाबत माहिती मिळाल्यास कोतवाली पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Kidnapping of a 16-day-old girl from her mother's arms