शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खर्डेकरांनी पाठविली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST

खर्डा : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांसाठी खर्डा (ता. जामखेड) येथील नागरिकांनी ८६ हजारांची रोकड, अन्नधान्य, कपडे, उबदार कपडे, बिस्कीट, ...

खर्डा : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांसाठी खर्डा (ता. जामखेड) येथील नागरिकांनी ८६ हजारांची रोकड, अन्नधान्य, कपडे, उबदार कपडे, बिस्कीट, औषधे आदी विविध जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात दीड लाख रुपयांची मदत पाठविली आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी आवाहन केले होते.

यासाठी खर्डा येथील युवकांनी मदतफेरी काढली होती. त्यास गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. रोकड, धान्य, कपडे, किरणा, गहू, ज्वारी, तांदूळ, औषधे, पाण्याचे बॉक्स आदी जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या. या मदतफेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक, मेडिकल असोसिएशन, कृषी सेवा केंद्र विक्रेते आदी संघटनांनी ८६ हजार रुपयांची रोकड जमा केली.

यावेळी उपसरपंच श्रीकांत लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, सेवा सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष लष्करे, सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र काळे, प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, दादा जावळे, अशोक खटावकर, कल्याण सुरवसे, शिवाजी भोसले, बापूसाहेब ढगे, कपिल लोंढे, ज्ञानेश्वर इंगोले, विकास शिंदे, भीमा घोडेराव, अरविंद गुजर, पका काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

----

२९ खर्डा मदत

खर्डा येथे पूरग्रस्तांसाठी मदत निधी जमा करताना ग्रामस्थ.