कर्जतला रानभाजी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST2021-08-17T04:27:16+5:302021-08-17T04:27:16+5:30

कर्जत : कर्जत तालुका कृषी विभागाच्या वतीने कर्जत येथे रविवारी रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. रानभाज्यांविषयी जागृती व्हावी. त्यांचे ...

Karjatla Ranbhaji Mahotsav | कर्जतला रानभाजी महोत्सव

कर्जतला रानभाजी महोत्सव

कर्जत : कर्जत तालुका कृषी विभागाच्या वतीने कर्जत येथे रविवारी रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. रानभाज्यांविषयी जागृती व्हावी. त्यांचे आहारामधील महत्त्व सर्वसामान्य लोकांना माहीत व्हावे, यासाठी रानभाजी महोत्सव प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो.

अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. आपल्या भागात तांदूळजा, चिगळ, शेवगा, रानभेंडी, उंबर, अळू कपाळफोडी, अंबाडी, भुईआवळा, खापरफुटी आदी रानभाज्या सहज उपलब्ध होतात. यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, बापूसाहेब होले यांनी रानभाज्यांचे महत्त्व सांगितले. यावेळी कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी संजय घालमे, अनिल भापकर, हिंदुराव मोरे, रामदास राऊत, शीतल पाचारणे, बाळासाहेब तांबडे, बापूसाहेब होले आदी उपस्थित होते.

Web Title: Karjatla Ranbhaji Mahotsav