शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
3
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
4
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
5
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
6
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
7
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
8
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
9
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
12
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
13
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
14
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
15
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
16
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
17
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
18
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
19
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
20
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
Daily Top 2Weekly Top 5

कांताबाई सातारकरांची मुलगी, नातवाचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

संगमनेर (अहमदनगर) : तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन होण्यापूर्वी पाच दिवस ...

संगमनेर (अहमदनगर) : तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन होण्यापूर्वी पाच दिवस अगोदर त्यांची मोठी मुलगी अनिता ऊर्फ बेबीताई यांचे संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. ०१) रात्री उशिरा बेबीताई यांचा मुलगा बबलू ऊर्फ अभिजित (वय ३८) यांचे नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना लोककला जिवापाड जपणारे आणि या कलेवर आतोनात प्रेम असलेले तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दहा सदस्यांना मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांवर संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यातील काही जणांना घरी सोडण्यात आले होते. दरम्यान, कांताबाई सातारकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर संगमनेरात घरीच उपचार सुरू असताना वयाच्या ८२व्या वर्षी २५ मे ला कांताबाईंचे निधन झाले होते. कुटुंबातील सर्वच सदस्य उपचार घेत असल्याने बेबीताई यांचा मुलगा बबलू हे सहन करू शकेल का? या सगळ्यांचा विचार करून बेबीताईंच्या निधनाची बातमी जाहीर केली नव्हती. असे खेडकर कुटुंबीयांचे निकटवर्तीय व ज्येष्ठ पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात बबलू यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना नाशिकला खासगी रुग्णालयात हलविले होते. मात्र, मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. कांताबाई सातारकरांची मुलगी अनिता त्यानंतर कांताबाई व त्यांचा नातू बबलू या तिघांचे एकामागोमाग निधन झाले. खेडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

-----------

बबलू यांच्या पार्थिवावर संगमनेरात अंत्यसंस्कार

२५ मे ला कांताबाई सातारकर यांचे निधन झाले. त्याआधी पाच दिवस त्यांची मोठी मुलगी अनिता ऊर्फ बेबीताई यांचे उपचारादरम्यान निधन झाले. बेबीताई व कांताबाई सातारकर यांच्या पार्थिवावर संगमनेरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बबलूचे पार्थिव नाशिकहून संगमनेरला आणत शहरातील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बबलू यांची पत्नी अमृता यांनी अग्निडाग दिला.