जावेद अख्तर यांनी संघ समजून घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:22+5:302021-09-06T04:25:22+5:30

नेवासा (अहमदनगर) : गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. अख्तर यांनी ...

Javed Akhtar should understand the team | जावेद अख्तर यांनी संघ समजून घ्यावा

जावेद अख्तर यांनी संघ समजून घ्यावा

नेवासा (अहमदनगर) : गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. अख्तर यांनी संघ समजून घेण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

मंत्री कराड यांनी रविवारी सकाळी श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासा) येथे भेट देऊन दत्त दर्शन घेतले. यावेळी देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी मंत्री कराड यांचे स्वागत केले. यावेळी ते बोलत होते.

कराड म्हणाले, संतांच्या आशीर्वादामुळे मंत्रिपद मिळाले. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. शेतकरी, मजूर, युवकांच्या उन्नतीसाठी सरकारचे काम सुरू आहे. शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकरी वर्गाला होत आहे. मात्र, त्याचबरोबर पीक विमा योजनेत मात्र राज्य सरकारच्या चुकीच्या सर्व्हेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना फायदा होईल असा या योजनेत सुधार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुद्रा योजनेत युवकांना कर्ज मिळत नसल्याबाबत तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने लवकरच सर्व बँक अध्यक्षांची बैठक बोलावणार आहोत, असे कराड यांनी सांगितले.

-----

मुंडे कुटुंबाशी कटुता नाही..

मुंडे कुटुंबाशी माझे गेल्या तीस वर्षांपासूनचे संबंध आहेत. मुंडे वहिनी व गोपीनाथगडाच्या आशीर्वादानंतरच मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आमच्यात कुठलीही कटुता नाही, असे कराड यांनी सांगितले.

Web Title: Javed Akhtar should understand the team