शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जगताप यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या

By admin | Updated: June 24, 2016 01:19 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील उपकेंद्र तसेच श्रीगोंदा तालुक्यातील सहा व नगर तालुक्यातील एक अशा सात उपकेंद्रांना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मंजुरी आणली.

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील उपकेंद्र तसेच श्रीगोंदा तालुक्यातील सहा व नगर तालुक्यातील एक अशा सात उपकेंद्रांना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मंजुरी आणली. तालुक्यातील सहा उपकेंद्रांची कामे गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे आमदार राहुल जगताप यांची पत्रकबाजी म्हणजे आयत्या पिठावर रेषा मारल्याचा प्रकार आहे, अशी टीका श्रीगोंदाच्या नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केली. त्या म्हणाल्या, बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन श्रीगोंदा शहरातील विविध योजना मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. या निधीमधूनच शहरातील रस्ते, भूमिगत गटार, पथदिवे, श्रीगोंदा शहराची कायमस्वरुपी पाणी टंचाई दूर होण्यासाठी सुमारे ४९ कोटी रुपये खर्चाची घोड नळ पाणी योजना, श्रीगोंदा शहरातील वाढती वीज मागणी विचारात घेऊन आणि शहरातील भारनियमन बंद करण्यासाठी स्वतंत्र उप वीज केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. तालुक्यातील लिंपणगाव, पेडगाव, निमगाव खलू, येळपणे, भानगाव, पिंपळगाव पिसा व नगर तालुक्यातील गुंडेगाव या सात उपकेंद्रांना आघाडी सरकार असताना पाचपुते यांनी मंजुरी दिली. तसेच अनेक वीज उपकेंद्राची भूमिपूजनेही झाली होती. त्यावेळी राहुल जगताप आमदार नव्हते. श्रीगोंदा शहर व तालुक्यातील वीज, रस्ते, पाणी या विकास योजना पाचपुते यांनी राबविल्या. मात्र स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी जगताप व त्यांचे समर्थक सोशल मीडियातून केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. आ.जगताप श्रीगोंदा शहरातील विकासात्मक कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. शहराच्या विकासासाठी आतापर्यंत त्यांनी किती निधी आणला? नगरपालिकेच्या निर्णयाची वाट न पहाता लोकप्रतिनिधी म्हणून आ.जगताप यांनी किती टँकरने शहराला पाणी पुरवठा केला हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही नगराध्यक्ष शिंदे यांनी दिले आहे.