शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

मराठी मावळ्यांचा ‘न्यूयॉर्क ’मध्ये जागर

By admin | Updated: January 13, 2016 23:49 IST

संगमनेर : महाराष्ट्रातील तरुण मराठी मावळ्यांनी न्यूयॉर्क (अमेरिका) मध्ये स्थापन केलेल्या छत्रपती फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.

संगमनेर : महाराष्ट्रातील तरुण मराठी मावळ्यांनी न्यूयॉर्क (अमेरिका) मध्ये स्थापन केलेल्या छत्रपती फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. जिजाऊ जन्मोत्सव अनेक देशांत या वर्षी पहिल्यांदा साजरा होत आहे. यावर्षी न्यूयॉर्क (अमेरिका) येथे महाराष्ट्रातील तरुणांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून जगातील अमेरिका, कॅनडा, आस्ट्रेलिया, यूक्रेन, इंग्लंड, ब्राझील, रशिया, चीन, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, दुबई आदी सर्व ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव एकाच वेळी साजरा करण्यात आला. सिंदखेड राजा येथील जिजाऊं च्या जन्मोत्सवासह देश-विदेशातील मावळ्यांनी त्यांच्या स्मृती जागवत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. गुजरात, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील तरुण-तरुणींनीही सहभाग घेतला. जगभरात व्यवसाय, नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने गेलेल्या भारतीय तरुणांना संघठीत करून फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत देण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. फाउंडेशनचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय संपर्कप्रमुख विनोद झेंडे, उपाध्यक्ष महेंद्र सिनारे, न्यूयॉर्क प्रांताचे अध्यक्ष प्रशांत भुसारी, न्यूयॉर्क मीडिया संपर्कप्रमुख मुजम्मील मुकादम, न्यू जर्सी प्रांताचे अध्यक्ष वंदन पटेल, कनेक्टीकेट प्रांताचे अध्यक्ष वेदांत रेड्डी, टेक्सास प्रांताचे अध्यक्ष महेंद्र बंगेरा, कॅलिफोर्निया प्रांताचे अध्यक्ष रतनपाल कांबळे, युवती अध्यक्षा माधुरी झिंजुर्डे, उपाध्यक्षा नवप्रीत कौर, मेघाली पवार, अंकिता रेड्डी, स्नेहा घोलप, विभुती पारेख, अल्पिता पटेल, किंजल पटेल, केयुर पटेल, शैलेश गौतम, राज पटेल, श्रीराम रेड्डी, आदेश पवार, वैभव मूले, वैभव बांगर, सतीश बोंबले, अभिजीत जाचक, प्रिया माने, ऐंजेलीनो वेगीस, जॉन, सचिन सिंग, पीटर, विशाल सस्ते आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)