शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

‘परका उमेदवार’ हाच कर्जत-जामखेडच्या प्रचाराचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 11:47 IST

पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत -जामखेड मतदारसंघात ‘परका’ उमेदवार हा भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा झाला आहे. ‘बारामतीचे पवार कोठेकोठे अतिक्रमण करणार?’ अशी टीका केली जात आहे़ विखे यांनीही पवारांविरुद्ध शड्डू ठोकले आहे. स्थानिक अस्मितेच्या मुद्यावरच येथील निवडणूक होण्याची शक्यता आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा / विश्लेषण/  अण्णा नवथर ।  अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत -जामखेड मतदारसंघात ‘परका’ उमेदवार हा भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा झाला आहे. ‘बारामतीचे पवार कोठेकोठे अतिक्रमण करणार?’ अशी टीका केली जात आहे़ विखे यांनीही पवारांविरुद्ध शड्डू ठोकले आहे. स्थानिक अस्मितेच्या मुद्यावरच येथील निवडणूक होण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तरेच्या सुजय विखे यांचे दक्षिणेत काय काम? असा मुद्दा प्रचारात उपस्थित केला होता. आता विधानसभेला हाच मुद्दा कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीवर उलटला आहे. रोहित पवार यांचे कर्जत-जामखेडमध्ये काय काम? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. राम शिंदे यांसह खासदार सुजय विखे हा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहेत. शिंदे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरताना कर्जतमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षाही हे शक्तिप्रदर्शन मोठे होते. पाऊस असतानाही ते शक्तिप्रदर्शन करण्यात यशस्वी झाले. या निवडणुकीतील जिल्ह्यातील आजवरचे हे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन मानले जाते. ‘मी सालगड्याचा मुलगा आहे. माझे आईवडील हे काही आमदार, खासदार, मंत्री नव्हते. ते (रोहित पवार) मात्र  मालक आहेत. मालक तुमची सेवा करेल की ‘भूमिपुत्र सालगडी’ हे ठरवा’ असे भावनिक आवाहन शिंदे यांनी केले. आपल्या आई, वडिलांनाही त्यांनी व्यासपीठावर बसविले होते. मतदारसंघात केलेल्या विकास कामांची यादीच सभेत त्यांनी मांडली. आपण काय कामे केली ती यादी सर्व मतदारांच्या मोबाईलवर अ‍ॅपद्वारे दिलेली आहे. सूतगिरणी आणली. त्यातून वर्षभरात एक हजार तरुणांना रोजगार मिळेल. कृषी महाविद्यालय आणले. जलसंधारणात सर्वाधिक निधी आणला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहोत. बारामतीकरांनी नगर जिल्ह्यासाठी यापूर्वी काय दिले हे सांगावे? त्यांची सत्ता होती त्यावेळी कुकडीचा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही? आपण कुकडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी निधी मंजूर केला आहे. यापुढे कृष्णाचे पाणी भीमेत व भीमेचे पाणी सीनेत आणले जाईल, असा मुद्दा शिंदे यांनी मांडला. खासदार विखे यांच्या भाषणाचा सर्व रोख हा पवार घराण्याविरुद्ध होता. पवार लोकसभेला म्हणाले की मावळची आम्हाला बारामती करायची आहे. आता कर्जत-जामखेडची बारामती करायची आहे असे सांगतात. हे कोठे-कोठे बारामती करणार आहेत व किती मतदारसंघात जाऊन अतिक्रमण करणार आहेत? राष्ट्रवादीची सत्ताच येणार नाही तर हे आश्वासने कशी पूर्ण करणार? अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी यापूर्वी मतदारसंघातील स्थानिक उमेदवार देत होती. यावेळी रोहित  यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक नेत्यांना आपली इच्छा म्यान करावी लागली आहे. पवारांच्या घरातील उमेदवार असल्याने कोणीही बंडखोरीची भाषा केलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने काम करणार का? यावर पवारांची भिस्त अवलंबून आहे. राष्ट्रवादीने स्थानिक उमेदवार का दिला नाही? या प्रश्नाचेही रोहित पवार यांना प्रचारातून शंकासमाधान करावे लागणार आहे. रोहित पवार यांनी पुणे, बारामती येथून आपली यंत्रणा कर्जत-जामखेड मतदारसंघात कामाला लावली आहे. बारामती, पुण्याची वाहने सध्या मतदारसंघात वाढली आहेत, अशी टीका शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना केली. रोहित यांचे सोशल मीडियावरील जे समर्थक आहेत तेही बहुतांश पुणे जिल्ह्यातील आहेत. सोशल मीडियावरील प्रचारात त्यांचा अधिक भर आहे. रोहित यांची यंत्रणा या मतदारसंघात फिरत असल्याने विखे यांनीही आपली यंत्रणा शिंदे यांच्या मदतीला पाठवली आहे. पवारांच्या विरोधात विखे हे पूर्णत: शिंदे यांच्या मदतीला मैदानात उतरल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019