शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा शिक्षकांची नावे संकेतस्थळावर

By admin | Updated: August 23, 2014 00:42 IST

अहमदनगर : आंतरजिल्हा बदली पात्र १ हजार ५६४ शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार करून ती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अहमदनगर : आंतरजिल्हा बदली पात्र १ हजार ५६४ शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार करून ती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. शनिवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्राथमिक शिक्षण विभागाचा मानस असून उशिरात उशिरा रविवारपर्यंत ही यादी संकेतस्थळावर झळकणार आहे. जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घ्यावे की नाही. त्याऐवजी रिक्त झालेली पदे सरळसेवा भरतीने भरावीत याबाबत संभ्रम आहे. काही जिल्हा परिषद सदस्य आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर काही नवीन भरतीसाठी आग्रही आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या बाजूने ठराव करण्यात आला आहे.जिल्ह्यात ६१८ शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या असून यातील २१७ जागांवर शिक्षकांचे समायोजन करण्यात आलेले आहे. सद्य परिस्थितीत ४०० च्या जवळपास जागा शिल्लक असून नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात शिक्षकांची बिंदूनामावली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर साधारण रिक्त राहणाऱ्या जागाचा तपशील जिल्हा परिषदेला मिळणार आहे.जिल्ह्यात आंतर जिल्हा बदलीने बदलून येणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. १ हजार ५६४ शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. यादीत शिक्षकांची नावे वरखाली होऊ नयेत, यादीत पारदर्शकता राहावी, यासाठी ही जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. दोन दिवसापासून ही यादी संकेतस्थळावर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शनिवारपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा शिक्षण विभागाला आहे. ती न झाल्यास रविवार पर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आंतरजिल्ह्यांचे अधिकार जिल्हा परिषदांना ?राज्य ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदलीचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदांनी घ्यावे, असे आदेश काढले असल्याची चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहे. दोन दिवसांत याबाबत अध्यादेश मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र, शनिवारपर्यंत असा कोणताच आदेश मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.