शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेने सुरक्षा वाढवावी

By admin | Updated: March 1, 2016 23:32 IST

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांवर दरोडे पडण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत.

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांवर दरोडे पडण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. वाढलेल्या घटना रोखण्यासाठी जिल्हा बँक उपाययोजना करणार की नाही, असा सवाल नाशिक विभाग शिक्षक लोकशाही आघाडी अध्यक्ष हिरालाल पगडाल यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा बँकेने ठेवीदार, खातेदार यांना सुरक्षा आणि सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. जिल्हा बँकेच्या शाखांवर पडणाऱ्या दरोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पगडाल यांनी पत्रकाद्वारे हे मत नोंदविले आहे. ग्रामीण भागात जिल्हा बँकेच्या शाखांच्या इमारती असुरक्षित आहेत. त्यांच्या इमारतीची दूरवस्था झालेली असून या शाखा सुरक्षित ठिकाणी सर्व सोयीयुक्त ठिकाणी हलवल्या पाहिजे. बँकेने अद्याप कोअर बँकिंग सुविधा, एटीएम सुविधा सुरू केलेली नाही. बँकेला स्वत: चा आयएफएसई कोड नाही. पुरेसे मनुष्यबळ नाही. शाखांमध्ये ग्राहकांसाठी वेटींग पिरिएड काळात पुरेशी बैठक व्यवस्था नाही. पंखे, स्वच्छतागृह नाहीत. कमी कर्मचारी वर्गावर कामाचा अधिक ताण असल्याने ते तणावग्रस्त मनस्थितीत असतात. ग्राहक व ठेवीदार यांना सौजन्यपूर्ण सेवा मिळत नाही, असे आरोप पगडाल यांनी उपस्थित केले आहेत. बँकेचे संचालक निवडणुकीत जेवढे दक्ष असतात तेवढे कारभाराबाबत दक्ष असल्याचे दिसत नाहीत. बँक व्यवस्थापनाची खरेदी- विक्री सोसायट्या, साखर कारखाने, दूध संघ व दूध सोसायट्यांवर मेहेरनजर आहे. दुसरीकडे पगारदार नोकरांच्या पतसंस्था, प्राथमिक शिक्षक पेन्शन, ग्रामीण भागातील वीजबिल वसुली, माध्यमिक शिक्षकांचे पगार याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. बँकेने आता अन्य बँकांच्या तुलनेत स्पर्धात्मक सेवासुविधा दिल्या नाहीत तर लवकरच बँकेला ओहोटी लागेल, अशी शंका पगडाल यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)