शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरचा बाजार राज्यात आदर्श मॉडेल

By admin | Updated: March 26, 2024 18:27 IST

विनोद गोळे, पारनेर बाजारात शेतकरी, व्यापार्‍यांना बसण्यासाठी भक्कम व विस्तीर्ण ओटे, ओट्यांमधील अंतरही भरपूर, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, झाडांची सावली,

विनोद गोळे, पारनेर बाजारात शेतकरी, व्यापार्‍यांना बसण्यासाठी भक्कम व विस्तीर्ण ओटे, ओट्यांमधील अंतरही भरपूर, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, झाडांची सावली, महिला-पुरुषांसाठी स्वच्छतागृहे व व्यवस्थित नियोजन, परिसर स्वच्छता यामुळे पारनेरमधील रविवारचा आठवडे बाजार राज्यासाठी मॉडेल बाजार ठरत आहे. पारनेर तालुक्याचे गाव. बसस्थानकाजवळ व कुठल्याही रहदारीला अडथळा होणार नाही अशी रचनाच पूर्वीपासून या बाजारतळावर आहे. देशभरातील स्वातंत्र्य चळवळीपासून संयुक्त महाराष्टÑ चळवळ, भूमीहिनांसाठी आंदोलनापासून आताच्या पारनेर मतदारसंघ वाचविण्याच्या आंदोलनापर्यंतच्या सर्व घटनांचे व देशभरातील प्रमुख व्यक्तींच्या सभा गाजल्याचे हे ऐतिहासिक ठिकाण असल्याने पारनेर बाजार तळाला बाजाराव्यतिरिक्त वेगळे स्वरुप आहे. हिरवीगार झाडे आणि नियोजनबद्ध विकास पारनेर बाजारतळ व परिसराची जागा विस्तीर्ण आहे. हिरवीगार झाडांनी नटलेला परिसर सर्वांची ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करतो हे मुख्य वैशिष्ट्य आहे. विजय औटी यांनी आमदार झाल्यावर या ऐतिहासिक बाजारतळाचा नियोजनबद्ध केलेला विकास सर्वांसाठी लाभदायक ठरत आहे. यामध्ये गेल्या दहा वर्षांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा महत्त्वाचा वाटा आहे. विस्तीर्ण ओटे, अंतर्गत काँक्रीटीकरण, पूर्वीचे पडलेले ओटे, पावसाळ्यात चिखलातून पायवाट काढणे असे चित्र होते. पारनेर ग्रामपंचायतीने प्रथम शेतकरी, व्यापार्‍यांसाठी दगडी ओट्याची व्यवस्थित बांधणी केल्यामुळे भक्कम व विस्तीर्ण ओटे केले आहेत. शिवाय दोन ओट्यांमध्ये भरपूर अंतराने कितीही गर्दी झाली तरी अडचण येत नाही.