इन्स्टाग्रामवर ओळख, बसस्थानकावर बोलावले, कारमध्ये बसवून...; अहिल्यानगरच्या तरुणीवर पुणे जिल्ह्यात नको ते घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:40 IST2026-01-10T16:39:36+5:302026-01-10T16:40:37+5:30
AhilyaNagar Crime: अहिल्यानगर जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणीवर तिच्याच बॉयफ्रेंडने बलात्कार केल्याची घटना घडली.

इन्स्टाग्रामवर ओळख, बसस्थानकावर बोलावले, कारमध्ये बसवून...; अहिल्यानगरच्या तरुणीवर पुणे जिल्ह्यात नको ते घडलं
२१ वर्षाच्या तरुणीची इन्स्टाग्रामवर आरोपीसोबत ओळख झाली. दोघांमधील बोलणं वाढत गेलं. नंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघे रिलेशनशिपमध्ये असताना आरोपीने दुसऱ्या मुलीसोबतही संबंध ठेवण्यास सुरू केले. याची माहिती तिला मिळाली आणि तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडले. पण, त्यांच्या दोघांचे असलेले फोटो दाखवत आरोपींने तिला ब्लॅकमेल केले आणि अत्याचार केला.
अहिल्यानगर शहरातील २१ वर्षीय तरुणीवर पुणे जिल्ह्यात नेऊन तरुणाने अत्याचार केला. तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार तरुणीची इन्स्टाग्रामवरून तरुणासोबत ओळख झाली होती. दोघे रिलेशनशिपमध्ये असतानाच तरुणाने आणखी एका तरुणीसोबत संबंध प्रस्थापित केले. त्या मुलीने पीडित तरुणीला याची माहिती दिली आणि तिने आरोपीसोबतचे संबंध तोडले.
दोघांचे नको ते फोटो अन्...
तरुणीने संबंध तोडल्याचा राग आरोपीला आला. त्याने आपले खासगी फोटो असल्याचे डिसेंबर २०२५ मध्ये तरुणीला सांगितले. ते फोटो डिलीट करण्यासाठी मला भेट असे म्हणून आरोपीने तरुणीला भेटायला बोलावले.
२९ डिसेंबर २०२५ रोजी पीडिता तारकापूर बसस्थानकावर गेली. तिथे हजर असलेल्या आरोपीने तरुणीला कारमध्ये बसवले आणि सायंकाळी आपण लग्न करून असे खोटे आश्वासन देऊन, भावनिक दबाव टाकून तिला पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि त्यानंतर मुळशी येथील नातेवाईकांच्या घरी नेले.
कागदावर सह्या, बलात्कार
नातेवाईकांकडे गेल्यानंतर तरुणाने तरुणीच्या कागदावर सह्या घेतल्या. हा कागद आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा आहे, असे सांगितले. फसवणूक करून सह्या घेतल्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी तरुणीवर त्याने अत्याचार केले.
याप्रकरणी तरुणीने अहिल्यानगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.