जेवण न दिल्याने हॉटेल मालकाचा दाबला गळा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:34 IST2021-05-05T04:34:59+5:302021-05-05T04:34:59+5:30

अहमदनगर: हॉटेलमधून जेवण न दिल्याने तिघा आरोपींनी हॉटेलमालकास लाकडी दांड्याने मारहाण करत त्याचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

Hotelier's strangled throat for not giving meals; | जेवण न दिल्याने हॉटेल मालकाचा दाबला गळा;

जेवण न दिल्याने हॉटेल मालकाचा दाबला गळा;

अहमदनगर: हॉटेलमधून जेवण न दिल्याने तिघा आरोपींनी हॉटेलमालकास लाकडी दांड्याने मारहाण करत त्याचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

नगर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल साईसेवा येथे २ मे रोजी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हॉटेलमालक संदीप मंजाबापू टिमकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश दादासाहेब जरे, युवराज भाऊसाहेब साळवे व सागर सोमनाथ टिमकरे (रा.तिघे इमामपूर) यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप टिमकरे यांनी त्यांचे हॉटेल दुसऱ्यांना चालवण्यास दिले आहे. २ मे रोजी रात्री तिघा आरोपींनी हॉटेलमध्ये येऊन जेवण देण्याची मागणी केली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने या तिघांनी त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी संदीप टिमकरे यांना बोलावून घेतले. टिमकरे हे आरोपींना समजावून सांगत असतानाच त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांचा गळा दाबला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधोर हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Hotelier's strangled throat for not giving meals;