ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या सरपंचांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:03+5:302021-06-03T04:16:03+5:30

दहिगावने : ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेत प्रयत्न करणाऱ्या सरपंच, उपसरपंचांचा स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. शेवगाव ...

Honoring the Sarpanch who took the initiative for vaccination of senior citizens | ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या सरपंचांचा सन्मान

ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या सरपंचांचा सन्मान

दहिगावने : ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेत प्रयत्न करणाऱ्या सरपंच, उपसरपंचांचा स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

शेवगाव तालुक्यात सुरू असलेल्या ‘गाव तेथे लसीकरण’ मोहिमेंतर्गत भावी निमगाव येथे बुधवारी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. यावेळी भावी निमगावचे सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, सुलतानपूर बु. (मठाचीवाडी) च्या सरपंच रूक्मिणी धोंडे यांचे पती माजी सरपंच सतीश धोंडे, उपसरपंच विठ्ठल जगदाळे, दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित श्रावणे व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचा गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या पद्धतीने वयोवृद्ध व्यक्तींना मतदानासाठी आणले जाते, त्या पद्धतीनेच मठाचीवाडीचे सरपंच, उपसरपंच तसेच भावी निमगावचे सरपंच व उपसरपंच आज वृद्ध अपंग व्यक्तींच्या लसीकरणासाठी सुयोग्य नियोजन करून गावामध्ये शांततेत लसीकरण करून घेत आहेत. हे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत स्वाभिमानी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जोशी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जरे, निलेश कुंभकर्ण, प्रवीण मरकड, संतोष शेळके, दत्तात्रय जरे, कोतवाल दत्तात्रय पवार, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Honoring the Sarpanch who took the initiative for vaccination of senior citizens