शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतात ट्रॅक्टर घातल्याने एकमेकांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST

परस्परविरोधी गुन्हे दाखल; जांभुळवाडीतील घटना लोकमत न्यूज नेटवर्क घारगाव : शेतात ट्रॅक्टर घातल्याच्या कारणावरून एकमेकांना लोखंडी गजाने व काठीने ...

परस्परविरोधी गुन्हे दाखल; जांभुळवाडीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

घारगाव : शेतात ट्रॅक्टर घातल्याच्या कारणावरून एकमेकांना लोखंडी गजाने व काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.३) दुपारी साडेचारच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांभुळवाडी (साकुर) शिवारात घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी फिर्यादीवरून १८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अशोक भागा थोरात (वय २८, रा. जांभूळवाडी, ता.संगमनेर ) याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश पोपट थोरात, नितीन रामा खेमनर, शंकर रामा खेमनर, चंदन रामा खेमनर, बाबाजी लहानु खेमनर, राजू भागा खेमनर, छबन मच्छिंद्र खेमनर, पोपट रखमा थोरात (सर्व रा. जांभुळवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी फिर्याद सारिका नितीन खेमनर (वय २३, रा. जांभूळवाडी, ता. संगमनेर) यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भागा नाना थोरात, अशोक भागा थोरात, सोपान भागा थोरात, बाळू नाना थोरात, प्रवीण बाळू थोरात यांसह इतर चार ते पाच अनोळखी इसम (सर्व रा. जांभुळवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हेडकॉन्टेबल सुरेश टकले करीत आहेत.