शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेचा आलेख उंचावला

By admin | Updated: June 26, 2023 12:12 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे़ विविध सत्र न्यायालयात वर्षभरात ३६ टक्के गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षा झाली आहे.

अहमदनगर: जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे़ विविध सत्र न्यायालयात वर्षभरात ३६ टक्के गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षा झाली आहे. मागील काही वर्षांच्या शिक्षेचे प्रमाण पाहता यंदा शिक्षा मिळण्याचा आलेख उंचावला असून भविष्यातही यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंगे आणि जिल्हा सरकारी वकील सतीष पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात नगरसह श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव आणि नेवासा येथे सत्र न्यायालय आहे़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ४९ आहेत़ या न्यायालयातील विविध गुन्ह्यांची निकाली माहिती घेतली़ न्यायालयांनी दिलेल्या महितीनुसार आरोपींना सन २००४ मध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण २़ ५८ टक्के होते़ हे प्रमाण यंदा २०़२ टक्यांवर पोहोचले आहे़ यावरून जिल्ह्यातील पोलिसांचे सहकार्य, सरकारी वकीलांचा सक्षमपणा, साक्षीदरांचे सहकार्य, वैद्यकीय अधिकार्‍यांचे सहकार्य, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त केल्याने हे शक्य झाले आहे़ श्रीरामपूर सत्र न्यायालयात अंबिका डुकरे हिच्या हत्या संबंधित आरोपीस फाशीची शिक्षा झाली़ जेऊर टोलनाका येथे अनिल लाजरस शिंदे यांच्या हात्येप्रकरणातील आरोपींना जन्मठेप झाली़ मुनोत खून खटल्यात सहा आरोपींना जन्मठेप झाली,यासारख्या विविध गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा झाली आहे़आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढत असून,भविष्यात ते आणखी वाढेल,असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे़ (प्रतिनिधी)