सर्वाधिक रुग्णसंख्या नगर जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST2021-08-17T04:27:08+5:302021-08-17T04:27:08+5:30

अहमदनगर : राज्यात दररोज सरासरी पाच ते सहा हजार कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये आठशे ते नऊशे रुग्ण ...

The highest number of patients is in Nagar district | सर्वाधिक रुग्णसंख्या नगर जिल्ह्यात

सर्वाधिक रुग्णसंख्या नगर जिल्ह्यात

अहमदनगर : राज्यात दररोज सरासरी पाच ते सहा हजार कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये आठशे ते नऊशे रुग्ण नगर जिल्ह्यातील आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सातशे ते आठशे रुग्ण दररोज आढळून येत असून ही कोरोना रुग्णांची संख्या सध्या राज्यात सर्वाधिक आहे.

राज्यात मुंबई महापालिका क्षेत्रात रविवारी २६२, पुण्यात ४३६, पुणे महापालिका क्षेत्रात २४४, सोलापूर ५८२, सातारा ६१९, सांगली ३६७ अशी सर्वाधिक रुग्णसंख्या आहेत, मात्र याहीपेक्षा सर्वात जास्त रुग्णसंख्या नगर जिल्ह्यात आढळून आली. रविवारी जिल्ह्यात ७४८, तर नगर महापालिका क्षेत्रात ४१ रुग्ण आढळून आले. सोमवारी ७५७ रुग्ण आढळून आले, त्यामध्ये नगर शहरात ३६ रुग्ण आहेत. त्यामुळे हा कोरोना रुग्णांचा आकडा सध्या राज्यातील सर्वाधिक आकडा आहे. पारनेर आणि संगमनेर या दोन्ही तालुक्यात सध्या शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. सध्या जिल्ह्यात सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असून ही संख्या अशीच वाढत राहिली तर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या जिल्ह्यात ६ हजार ११७ सक्रिय रुग्ण असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २६०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३५२ आणि अँटिजेन चाचणीत १४५ रुग्ण बाधित आढळले.

Web Title: The highest number of patients is in Nagar district