ज्येष्ठांना लसीकरणासाठी तरुणांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:53+5:302021-03-26T04:20:53+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनकाळात ऑनिक्स युथ क्लबच्या सदस्यांनी गरजू नागरिकांना मदत केली होती. कोरोना लसीकरणाच्या ...

ज्येष्ठांना लसीकरणासाठी तरुणांची मदत
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनकाळात ऑनिक्स युथ क्लबच्या सदस्यांनी गरजू नागरिकांना मदत केली होती. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला मार्च महिन्यात सुरुवात झाली आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली असून ज्येष्ठ नागरिक व आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ती देण्यात येते आहे. मात्र, अनेक ज्येष्ठ नागरिकांना ॲपवर ऑनलाइन नोंदणी करता येत नाही, अनेकांकडे नोंदणी करण्यासाठी लागणारे विशिष्ट मोबाईल नाहीत. तसेच काहीकडे नोंदणी करण्यासाठी मोबाईल नाहीत. अशा अनेक अडचणींचा सामना ज्येष्ठ नागरिकांना करावा लागत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने कल्बच्या सदस्यांना सांगितले. अशा नागरिकांसाठी कल्बच्यावतीने मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले असून त्यासाठी संपर्कासाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी विनामूल्य नाव नोंदणी करणे तसेच त्यांना लसीकरणासाठी निवडलेल्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सहकार्य करण्यात येते आहे. कल्बचे संस्थापक प्रथमेश बेल्हेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कल्बचे अध्यक्ष ओम कोळपकर, उपाध्यक्ष अथर्व देशमुख यांसह आदित्य भागवत, कल्याणी बेल्हेकर, अदिती देशमुख, मानसी जोशी, शुभम डावखरे आदी सदस्य परिश्रम घेत आहेत.