पाचेगावात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST2021-09-23T04:24:04+5:302021-09-23T04:24:04+5:30

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पाचेगावसह परिसरातील गोणेगाव, पुनतगाव, इमामपूर, निंभारी पट्ट्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दोन दिवसांत ...

Heavy rain in Pachegaon | पाचेगावात दमदार पाऊस

पाचेगावात दमदार पाऊस

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पाचेगावसह परिसरातील गोणेगाव, पुनतगाव, इमामपूर, निंभारी पट्ट्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दोन दिवसांत दीड इंच पाऊस नोंदला गेला.

मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आलेल्या पावसाने परिसरात दाणादाण उडाली. जवळपास पाऊण तास जोरदार सरीवर सारी कोसळत होत्या. त्यानंतर, पावसाची रात्रभर रिपरिप सुरूच होती. बुधवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने पंधरा मिनिटे हजेरी लावली. सध्या परिसरात सोयाबीन, बाजरी पिकाच्या सोंगण्या सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाली. ऊस, कपाशी, मका आदी पिकांना मात्र या पावसाने दिलासा मिळाला आहे.

पाचेगाव येथील केंद्रीय जल आयोगाच्या पर्जन्यमापकावर मंगळवारी झालेल्या दमदार पावसाची ३७ मिलिमीटर (दीड इंच) तर बुधवारी झालेल्या पावसाची ५ मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली होती. पाचेगाव येथे यंदाच्या पावसाळी हंगामात ६११ मिलिमीटर(चोवीस इंच) इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

220921\img_20210921_152714.jpg

???????? ??????? ????? ?????

Web Title: Heavy rain in Pachegaon