शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चालण्याची सवय मोडली, गुडघेदुखी मागे लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST

----------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : अनेकांची चालण्याची सवयच बंद झाली आहे. अगदी भाजी किंवा दूध आणायचे असले तरी, ...

-----------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : अनेकांची चालण्याची सवयच बंद झाली आहे. अगदी भाजी किंवा दूध आणायचे असले तरी, अनेकजण वाहनावरूनच जातात. घरापासून रस्त्याचे अंतर चालण्यासारखे असले तरीही, वाहनांचाच वापर केला जातो. मुले तर वाहनाशिवाय घराबाहेरच पडत नसल्याचे चित्र आहे. वाहन चालविता येत असल्याने महिलांचे चालणेही कमी झाले आहे. अनेक कार्यालयांत कर्मचारी तासन् तास जागेवरच बसून असतात. त्यामुळे नको त्या वयात गुडघेदुखी, कंबरदुखी मागे लागली आहे.

पूर्वी बहुतांश कामे करण्यासाठी चालणे व्हायचे. भाजीपाला, दूध, दळण, किरकोळ कामांसाठी चालणे व्हायचे. रिक्षा, बसथांब्यापर्यंतही चालले जायचे. पण सध्या धकाधकीचे जीवन, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ कमी असल्याचे कारण देत प्रत्येकजण आपल्याजवळील वाहन घेऊन धावत आहे. त्यामुळे चालणेच बंद झाले आहे. चालणे कमी झाल्याने तसेच वेळेअभावी अनेकांचा व्यायाम बंद झाल्याने गुडघेदुखी, कंबरदुखी असे आजार पाठीमागे लागले आहेत. त्यामुळे अशा आजारांनी तरुण वर्गही त्रस्त आहे.

---

या कारणांसाठीच होतेय चालणे...

ज्येष्ठ : व्यायाम म्हणून सकाळ आणि सायंकाळ

महिला : किराणा दुकानापर्यंत, रिक्षा मिळेपर्यंत

पुरुष : घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत. शतपावली

तरुण : मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत

----------------

हे करून पाहा...

१) एक कि.मी. परिसरापर्यंत वाहनाचा वापर टाळा

२) कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमी घ्या

३) घाई नसेल त्यावेळी लिफ्टचा वापर टाळा

-----------

...म्हणून हाडाचे आजार वाढले

अनेकांना घराबाहेर जाणे होत नसल्याने सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते. कॅल्शिअम हाडात शोषणे थांबले की हाडाची दुखणी वाढतात. आजकाल ९५ टक्के लोकांमध्ये कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडांच्या दुखण्याचे प्रमाण वाढले आहे, असे येथील तज्ज्ञ डॉ. सुबोध देशमुख यांनी सांगितले. जवस, बदाम, अक्रोडसारख्या बियांमधून कॅल्शिअम, मिनरल्स मिळतात.

----------

ज्यांना चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी...

ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन-डी च्या गोळ्या घ्याव्यात. तसेच बसल्या जागेवर करण्यासारखे योग, प्राणायाम आणि घरगुती आसने आहेत, अशी आसने त्यांनी घरात बसून केली तरी यातून व्यायाम होऊ शकेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

---------------