मुथा यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST2021-02-12T04:19:47+5:302021-02-12T04:19:47+5:30

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील अ.ए. सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणमहर्षी कै. बाबुशेठ मुथा ...

Greetings to Mutha | मुथा यांना अभिवादन

मुथा यांना अभिवादन

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील अ.ए. सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणमहर्षी कै. बाबुशेठ मुथा यांना पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य अजयकुमार बारगळ होते. यावेळी प्रशालेचे सहअध्यक्ष हेमंत मुथा, डॉ. व्ही.एम. झंवर, प्रशालेचे क्रीडा अध्यापक बाबासाहेब पटारे, प्रशालेचे पर्यवेक्षक भीमराज आव्हाड, गौतम मुथा, सुरेश मुथा, अक्षय मुथा, बबलू मुथा, पोपट मुथा, महावीर मुथा, उदय मुथा, शिवाजी मंडलिक, राजाभाऊ कुसमुडे, अस्लम शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक नागदे यांनी केले. आभार ऋषिकेश कातोरे यांनी मानले. सूत्रसंचालन केशव देशपांडे व तुषार मरकड यांनी केले.

Web Title: Greetings to Mutha