राहाता प्रशासकीय कार्यालयामध्ये शासकीय योजनांचा शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:48+5:302021-08-28T04:24:48+5:30

अस्तगाव : कोरोना आपत्तीपूर्वी राहाता प्रशासकीय कार्यालयातून नागरिकांना योजनांमधून मोठा लाभ मिळत होता, परंतु सध्या राहाता प्रशासकीय कार्यालयांमध्ये ...

Government schemes in Rahata administrative office | राहाता प्रशासकीय कार्यालयामध्ये शासकीय योजनांचा शुकशुकाट

राहाता प्रशासकीय कार्यालयामध्ये शासकीय योजनांचा शुकशुकाट

अस्तगाव : कोरोना आपत्तीपूर्वी राहाता प्रशासकीय कार्यालयातून नागरिकांना योजनांमधून मोठा लाभ मिळत होता, परंतु सध्या राहाता प्रशासकीय कार्यालयांमध्ये योजनांचा शुकशुकाट दिसून येत आहे. कार्यालयीन अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कोरोनाचे कारण देण्यात आले आहे. परंतु सध्या संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये पंचायत समितीकडून घरकुल सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती तालुका गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी दिली आहेत.

राहाता तालुक्यातील पंचायत समिती व कृषी विभाग या प्रशासकीय कार्यालयात मंगळवारी लोकमत प्रतिनिधीने सर्व्हे केला. पंचायत समिती अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मागासवर्गीय शेतकरी यांना कडबाकुट्टी योजना सुरू होत आहे, परंतु मंजुरीविषयी जिल्हा परिषदेकडून प्रक्रिया निश्चित करण्यात आली नाही, अशी माहिती मिळाली. विहीर दुरुस्ती, आडवे बोर, वीज जोडणी व पाईप इत्यादी योजनांची ऑनलाइन नोंदणी चालू आहे. कृषी विभागातून महात्मा गांधी रोजगार हमी योजना ऑफलाईन चालू आहे. यामध्ये डाळिंब, सीताफळ, आंबा, पेरू तसेच चिकू इत्यादी योजनांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. परंतु काही ठिकाणी जिरायती भाग असल्यामुळे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत आहेत. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजनेत शेतकरी सर्पदंश, रस्ता अपघात, जंगली प्राणी हल्ला, वीज कोसळणे, विहिरीत कोसळणे यावर ऑफलाईन नोंद सुरू असल्याची माहिती मिळाली.

..............

घरकुल यादीतील नावांची पडताळणी

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील ड या घरकुल यादीतील एकूण ८९३ नावांची पडताळणी रवींद्र बोडसे, रमेश सोमवंशी व वाय. ए. देशमुख करणार आहेत तर केलवड गावातील ड यादीतील २०५ नावांची पडताळणी बाबासाहेब मगर व केंद्र प्रमुख शिरसागर हे अधिकारी करणार आहेत.

-------------

अर्जाची सोडत पुणे आयुक्तालयात

कांदाचाळ, पॅक हाऊस, ठिबक, स्प्रिंकलर, ट्रॅक्टर चलीत औजारे, कडबाकुट्टी, इलेक्ट्रॉनिक मोटार, शेत तलाव इतर योजना यांचा ऑनलाइन अर्ज करावा लागतो, परंतु काही शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी महाडीबीटी वर ऑनलाइन नोंद केली असतानादेखील अजून पुणे आयुक्तालयातून शेतकऱ्यांचे नाव निघाली नाहीत.

-----------------

तालुक्यातील गावांत घरकुलाविषयी सर्व्हे सुरू होत आहेत. शासनाकडून पंचायत समितीला सेस कमी मिळत असल्यामुळे निधी नाहीत.

-समर्थ शेवाळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, राहाता

..................

कृषी विभागातील जास्त योजना ऑनलाइन चालू आहेत. २०२०- २०२१ मध्ये तीन ड्रॉ निघाले होते. ऑनलाइन अर्ज जास्त असल्यामुळे जाहीर झालेल्या नावांत कमतरता येत आहेत.

- बापूसाहेब शिंदे, कृषी अधिकारी, राहाता

.................

फोटो २७ राहाता

Web Title: Government schemes in Rahata administrative office