पाचेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:57+5:302021-08-28T04:24:57+5:30

किशोर सुरेश राऊत (रा. पाचेगाव, ता. नेवासा) हे पाचेगाव फाटा रस्त्यालगत राहतात. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने ...

A goat was killed in a leopard attack in Pachegaon | पाचेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

पाचेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

किशोर सुरेश राऊत (रा. पाचेगाव, ता. नेवासा) हे पाचेगाव फाटा रस्त्यालगत राहतात. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेला बोकडावर हल्ला करून त्याला ठार मारले. या घटनेत किशोर राऊत यांचे सुमारे नऊ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. परिसरामध्ये दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यात वाढ होताना दिसत असून बिबट्याच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बिबटे पकडण्यासाठी वन विभागाने या परिसरात पिंजरे लावावेत, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून व्यक्त होत आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी बी. बी. पाठक, शल्यचिकित्सक डॉ. के. नजन, अशोक तुवर, किशोर राऊत, दीपक सोमवंशी आदी उपस्थित होते.

270821\img-20210827-wa0031.jpg~270821\1428-img-20210827-wa0030.jpg

पाचेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार~पाचेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

Web Title: A goat was killed in a leopard attack in Pachegaon