सोशल मीडियापेक्षा चिंतनाला वेळ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:35+5:302021-07-14T04:23:35+5:30

युवकांकडे स्वतःचे नियोजन तयार असावे. एखाद्या बाबीत अपयश आल्यास पर्याय काय? याचाही विचार आवश्यक आहे. सध्या सोशल मीडियावर तरुणाई ...

Give time to contemplation rather than social media | सोशल मीडियापेक्षा चिंतनाला वेळ द्या

सोशल मीडियापेक्षा चिंतनाला वेळ द्या

युवकांकडे स्वतःचे नियोजन तयार असावे. एखाद्या बाबीत अपयश आल्यास पर्याय काय? याचाही विचार आवश्यक आहे. सध्या सोशल मीडियावर तरुणाई अधिक वेळ खर्च करते. इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करताना त्यावर काय लिहावे यावर तासन‌्तास विचार करण्यापेक्षा त्या वेळेचा उपयोग मनन, चिंतन, व्यायाम आणि ध्यानधारणा या गोष्टींसाठी करायला हवा. प्रशासकीय सेवेत लाल दिव्याची गाडी मिळते. मात्र, त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रारंभी संचालक किशोर मरकड यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अध्यक्ष विजयकुमार ठुबे यांनी केले. परिचय संचालिका राजश्री शितोळे यांनी करून दिला. आभार मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश इथापे यांनी मानले. पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश इंगळे, संचालक उदय अनभुले, काशिनाथ डोंगरे, ज्ञानदेव पांडुळे, शोभाताई जाधव, निर्मलाताई गिरवले, पोपटराव काळे, विश्वास कारंजकर, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा स्वपूर्णा सावंत, पतसंस्थेचे मानद सचिव राजेंद्र ढोणे, व्यवस्थापक अशोक वारकड आदींसह पालक विद्यार्थी व्याख्यानाला ऑनलाइन उपस्थित होते. नगरसह राज्य तसेच परदेशातूनही नागरिक व्याख्यानात सहभागी झाले होते.

Web Title: Give time to contemplation rather than social media