शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात पुन्हा राजकीय एकीचा ‘घाट’

By admin | Updated: August 17, 2014 23:31 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत नगर तालुक्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची आघाडी स्थापनेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत नगर तालुक्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची आघाडी स्थापनेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. यादृष्टीने प्राथमिक चर्चा झाली असून, दोन दिवसात सर्वांची एकत्र बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समजली. माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी या एकत्रित आघाडीचे सारथ्य करण्याचे मान्य केल्याने नगर तालुक्याचे तीन आमदार होण्याच्या दृष्टीने तालुक्यात पुन्हा एकीची ‘राजकीय साद’ घालण्यात आली आहे.विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत नगर तालुक्याचे स्वतंत्र अस्तित्व संपल्याने तालुका श्रीगोंदा, पारनेर, राहुरी या तीन विधानसभा मतदारसंघात विभागला होता. मागील लोकसभेच्या निवडणुकीत गेली १५ वर्षे राजकीय संघर्ष केलेले आ. शिवाजी कर्डिले व दादा पाटील शेळके हे आपले राजकीय विळ्या-भोपळ्याचे नाते तोडून ‘नगर तालुक्याची अस्मिता’ म्हणून एकत्र आले होते. मात्र त्यानंतर लगेच त्यांच्यात दुही निर्माण झाली. भाजपा प्रवेशामुळे कर्डिले यांची ‘राहुरी’ फत्ते झालीच, पण त्यांचे विरोधक असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे हे युतीच्या धर्माने एकत्र आले. गाडे-कर्डिले एकत्र आले. मात्र गाडे-शेळके व कर्डिले-शेळके यांच्यातील व त्यांच्या कार्यकर्त्यांमधील दुही वाढत गेली.पारनेरचे आ. विजय औटी व श्रीगोंद्याचे आ. बबनराव पाचपुते यांच्या कार्यपद्धतीबद्दल नगर तालुक्यातून नाराजीचा सूर उमटू लागल्याने नगर तालुक्यात ‘राहुरी’च्या धर्तीवर श्रीगोंदा व पारनेरमध्येही आमदार निवडून आणून तालुक्याचे तीन आमदार करण्याबाबत तालुक्यातील काही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. आ.कर्डिले यांनी मागील महिन्यात नगर तालुक्यात काढलेल्या आभार दौऱ्यात नगर तालुक्यातील नेत्यांनी एकजूट दाखवल्यास तीन आमदार होऊ शकतात, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यानंतर या विषयाला जाहीर तोंड फुटले. (प्रतिनिधी)