श्रीगोंद्यातील १२ कोटींच्या बंधाऱ्यांना गडाखांचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST2021-03-25T04:21:28+5:302021-03-25T04:21:28+5:30

श्रीगोंदा : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील नव्याने करण्यात येणाऱ्या बारा बंधाऱ्यासाठी १२.७६ कोटी निधी ...

Gadakha's green lantern on 12 crore dams in Shrigonda | श्रीगोंद्यातील १२ कोटींच्या बंधाऱ्यांना गडाखांचा हिरवा कंदील

श्रीगोंद्यातील १२ कोटींच्या बंधाऱ्यांना गडाखांचा हिरवा कंदील

श्रीगोंदा : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील नव्याने करण्यात येणाऱ्या बारा बंधाऱ्यासाठी १२.७६ कोटी निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली.

मंजूर बंधाऱ्यांमध्ये शेडगाव येथील धोंडेवस्ती, शेडगाव बेट बंधारा १ कोटी २ लाख ८८ हजार ७५१ रुपये, टाकळी कडेवळीत नवलेवस्ती, भिंगाण लांडगे वस्ती, देवदैठण पिंपळडोह व माणिकडोहसाठी २ कोटी ४६ लाख ८२ हजार ३०० रुपये, येळपणे येथील खंडोबा मंदिर, रडतोंड डोह, बेलवंडी बु. शेरी, सारोळा सोमवंशी येथील संगम बंधारा १ कोटी २३ लाख ९७ हजार ६०० रुपये, बेलवंडी बु. येथील शिकारे मळा व घोडेगाव जांभळीचा डोहसाठी येथील बंधाऱ्यासाठी १ कोटी ३७ लाख ३८ हजार ५९८,

आढळगाव येथील बंधाऱ्यासाठी वलीबा व भावडी येथील मुंजावस्तीसाठी ५ कोटी ९९ लाख ९२०, चांभुर्डी येथील भुडकीसाठी १ कोटी २५ लाख १ हजार ४००, चांडगाव येथे मळई, श्रीगोंदा पुलाच्या खाली, तांदळी दुमाला येथील भोस वस्ती या ठिकाणी बंधारे मंजूर झाले आहेत.

Web Title: Gadakha's green lantern on 12 crore dams in Shrigonda