शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात चार ठार

By admin | Updated: December 20, 2015 23:22 IST

चांदेकसारे : मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत कारमध्ये असलेले दोन सख्खे भाऊ ठार झाल्याची घटना कोपरगाव ते संगमनेर रस्त्यावर शनिवारी रात्री घडली़

चांदेकसारे : मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत कारमध्ये असलेले दोन सख्खे भाऊ ठार झाल्याची घटना कोपरगाव ते संगमनेर रस्त्यावर शनिवारी रात्री घडली़ शांताराम गिताराम खरात (वय ४०) व संजय गिताराम खरात (वय ३३, राहणार चांदेकसारे) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत़ घटनेबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चांदेकसारे येथील रहिवासी शांताराम खरात व संजय खरात हे त्यांच्या एमएच ०४ ईजी ६९१० या वाहनामधून जात होते़ सागर भोसले हा चालक होता़ त्यांची कार चांदेकसारे येथील भैरवनाथ मंदिराजवळ असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या एमएच १५ ईजी ७४७७ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली़ या अपघातात शांताराम व संजय खरात जागीच ठार झाले़ अपघाताबाबत सुधाकर रामजी खंडीझोड यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यावरून ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पी़ एऩ बाबर करीत आहेत़ (वार्ताहर) पळवे : भरधाव टेम्पोची धडक बसून दोन वृध्द ठार झाले. नगर -पुणे महामार्गावरील पळवे भागात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये नामदेव बाबुराव फटांगडे (वय ८५) व राधुजी रखमाजी पोटघन (वय ८०) यांचा समावेश आहे. जातेगाव फाट्यावरुन गावाकडे जाण्यासाठी हे वृध्द रस्ता ओलांडत असताना पुण्याहून नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टेम्पोने (क्र. एमएच-०४-जीसी ६४८८) जोराची धडक दिल्याने हे दोघे बाजूला फेकले गेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद विजय दादाभाऊ पोटघन रा. जातेगाव यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक महेश वासुदेव कलमेष्ट यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास हवालदार पठाण करीत आहेत. जातेगाव घाटात अज्ञात वाहनाची धडक बसून नरेश मौर्य (वय २८, रा. शिरुर) हा तरुण जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.