शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील सिग्नलची लुकलुक थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST

अहमदनगर : वाहतूक व्यवस्थेच्या नियंत्रणासाठी शहरातील प्रमुख चाैकात सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र हे सिग्नल महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बंद पडले ...

अहमदनगर : वाहतूक व्यवस्थेच्या नियंत्रणासाठी शहरातील प्रमुख चाैकात सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र हे सिग्नल महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे चौकांमधून भरधाव वेगाने जात असून, बंद सिग्नल अपघातांनाच निमंत्रण देत आहेत. अपघात टाळण्यासाठी बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याची गरज आहे.

शहरतील कायनेटिक चौक, सक्कर चौक, स्वस्तिक चौक, एम्पिरीयल चौक, मार्केट यार्ड चौक, चांदणी चौक, जीपीओ चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, नागापूर चौक, एकवीरा चौक, भिस्तबाग चौक या चौकांमधील सिग्नल बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक नसल्याने सिग्नल बंद केले गेले. अनलॉकनंतर वरील चौकांतील सिग्नल सुरू झाले नाहीत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे वाहतूक शाखेला अशक्य होत आहे. चौकातील बंद सिग्नलमुळे ऐन चौकातच लहान मोठे अपघात होत आहेत. सिग्नल बंद असल्याने वाहन पुढे दामटण्याची स्पर्धा होऊन वाहतूक कोंडी तरच होतेच. शिवाय अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे चौक ओलांडताना पादचाऱ्यांची फजिती होते. वाहनांच्या कोंडीत पदचारी अडकण्याच्या घटना घडत आहेत. औरंगाबाद-पुणे महामार्गावर सर्वाधिक वाहतूक असते. या मार्गावर अशोका हॉटेल ते सक्कर चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असल्याने या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते.

...

प्रमुख महामार्गावरील सिग्नल बंद

शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद, मनमाड, कल्याण, सोलापूर महामार्गावरील सक्कर चौक, चांदणी चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, नागापूर चौक, जीपीओ अशा चौकांतील सिग्नल बंद आहेत.

....

वाहतूक कोंडीने गाठला कळस

शहरात सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे शहरातील दिल्लीगेट, सक्कर चौक, प्रेमदान चौक, एकवीरा चौक, चांदणी चौक, जीपीओ चौकांत वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नगरकरांना होत आहे.

.....

उड्डाणपुलाच्या कामासाठी बंद असलेले सिग्नल

सक्कर चौक, स्वस्तिक चौक, एम्पिरियल चौक, मार्केट यार्ड चौक

....

सावेडीतील सिग्नल बंद

एकवीरा चौक, भिस्तबाग चौक

.....

कंपनीने देखभाल दुरुस्ती केली बंद

शहरातील सिग्नलची देखभाल व दुरुस्ती लार्सन एण्ड टुब्रो कंपनी स्वत:हून करत होती. परंतु, या कंपनीने दुरुस्तीचे काम थांबविले असून, शहरातील सिग्नल बंद झाले आहेत.

....

- शहरातील बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याबाबत महापालिकेला वेळावेळी पत्र देण्यात आले आहे. परंतु, अद्याप सिग्नल सुरू झालेले नाहीत. सिग्नल सुरू करण्याची आवश्यकता आहे. सिग्नल बसविल्यास वाहतुकीचे व्यवस्थापन करणे शक्य होईल.

- राजेंद्र भोसले, वाहतूक शाखा निरीक्षक, अहमदनगर

.....

- शहरातील सिग्नलच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. काही सिग्नल उड्डाणपुलाच्या कामामुळे बंद आहेत. उर्वरित सिग्नल सुरू करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका