कोल्हारमध्ये दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:55+5:302021-09-25T04:20:55+5:30

स्नेहल विनायक वाकचौरे यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. बुधवारी (दि. २२) अमोल शंकर बर्डे याचा एका छोट्या ...

Fighting in two groups in Kolhar | कोल्हारमध्ये दोन गटात हाणामारी

कोल्हारमध्ये दोन गटात हाणामारी

स्नेहल विनायक वाकचौरे यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. बुधवारी (दि. २२) अमोल शंकर बर्डे याचा एका छोट्या मुलीला धक्का लागल्यावरून वाद झाला होता. तो सामंजस्यातून मिटला होता. मात्र याच वादाचा राग मनात धरून काल गुरुवारी (दि. २३) सकाळी जब्बार एजाज खान, अफरोज असलम, शेख, सलमान चांद खान, आबिद जमशेद सय्यद, शाहरुख चाँद शेख यांनी तलवारी व लाकडी दंडुके घेऊन घरासमोर येऊन आम्हाला शिवीगाळ करत तलवारी व लाकडी दंडुक्याचा धाक दाखविला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सुलताना अस्लम शेख यांनी दुसरी फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी माझी १२ वर्षीय नात घरासमोर खेळत असताना अमोल शंकर बर्डे याने दारूच्या नशेत तिला धक्का दिल्याने ती रोडवर पडली. यामुळे मी त्याला जाब विचारला. त्यानंतर त्याने रात्री ९ वाजता त्याचा भाऊ कार्तिक शंकर बर्डे हा दारू पिऊन माझ्या घरासमोर हातात कुऱ्हाड घेऊन आला. हातपाय तोडून टाकण्याची आम्हाला धमकी दिली. २३ रोजी सकाळी अमोल शंकर बर्डे, कार्तिक शंकर बर्डे, विशाल भाऊसाहेब बर्डे, मुकुंद शिवाजी गांगुर्डे व इतर एक जण असे हातात लाठ्याकाठ्या, कुऱ्हाडी घेऊन घरासमोर आले. आणि आम्हाला धमकावत माझ्या घरावर दगडफेक करून पळून गेले असे म्हटले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी हे करत आहेत.

........................

संबंधितावर ॲस्ट्रॉसिटी दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २४) आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी या कार्यकर्त्यांना यावेळी दिले. शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्थेचे दीपक बर्डे, शिवप्रहार प्रतिष्ठान सूरज आगे, एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष योगेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष सम्राट हासे, विशाल माळी, प्रशांत बर्डे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला जिल्हाध्यक्ष जया डोळस, साई बालाजी ग्रुप सागर बेग पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश जेधे, चंद्रकांत जाधव, सागर राक्षे यावेळी उपस्थित होते.

240921\img-20210924-wa0098.jpg

कोल्हारमध्ये हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर अँस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोणी पोलिस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती.

Web Title: Fighting in two groups in Kolhar