शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: October 18, 2024 18:55 IST

सोबलेवाडी येथील शेतकरी बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याने आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

पारनेर : तलाठ्याच्या दिरंगाईमुळे राज्य सरकारकडून आलेले नांगरट व मशागतीचे अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ सोबलेवाडी येथील शेतकरी बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याने आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर शेतकऱ्याला अटक करण्यात आली. गुरूवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, पारनेर जवळील सोबलेवाडी येथील बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर दुष्काळामुळे राज्य सरकारने दिलेले नांगरटीचे व मशागतीचे अनुदान वर्गच झाले नाही. तलाठ्याकडून काही चुका झाल्याने अनुदान रखडले व सोबलेवाडी येथील इतर शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, अशी सोबले यांची तक्रार आहे. गुरूवारी सकाळी अकरा वाजता बबन सोबले यांनी पारनेर येथील वेशीनजीक असलेल्या आमदार औटी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांना माहिती दिली. औटी यांनीही तातडीने याची दखल घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी शेतकरी सोबले कार्यालया बाहेर गेले व हातातील रॉकेलच्या बाटलीतून रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.ही घटना पाहताच आ. औटी यांचे स्वीय सहाय्यक योगेश वाघ, चालक आयाज राजे, गिरीश साळवे यांनी तातडीने शेतकऱ्याच्या हातातील रॉकेलची बाटली व काडीपेटी काढून घेतली.घटनेनंतर पारनेर पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी योगेश वाघ यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार सोबले यांच्यावर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अनुदान मिळणे कठीणशेतकरी बबन सोबले यांनी जरी आत्मदहनाचा प्रयत्न केला तरी पारनेरच्या तलाठ्याची बदली झाल्याने तेथे नवीन तलाठयाची नेमणूक आहे. नवीन तलाठी अजून हजर नसल्याने सोबले यांना सध्यातरी हे अनुदान तातडीने मिळणे अवघड आहे. (तालुका प्रतिनिधी)पहिल्यांदा भेटबबन सोबले नांगरट व मशागतीचे अनुदान मिळाले नाही म्हणून पूर्वी आमदार औटी यांना भेटले नाहीत. गुरूवारी प्रथमच ते संपर्क कार्यालयात आले व त्यानंतर त्यांनी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला.योगेश वाघ,आ.औटी यांचे स्वीय सहाय्यकटोलवाटोलवीमी माझे व वडिलांच्या नावावरील मशागत व नांगरटीचे अनुदान बँकेत जमा नाही म्हणून पारनेरच्या तलाठ्याकडे चौकशी केली. त्यावेळी अनुदान बँकेत वर्ग झाल्याचे सांगण्यात आले. बँकेत गेल्यावर अजून तुमचा धनादेश आला नाही, असे सांगण्यात येत होते.यामुळे वैतागून आत्मदहनाचा प्रयत्न केला.बबन सोबले,आंदोलक शेतकरी