हनीट्रॅपमधील बनावट पतीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:30+5:302021-07-22T04:14:30+5:30

या गुन्ह्यात अटक असलेली शीतल किरण खर्डे हिने फसवणुकीच्या उद्देशानेच पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याशी ओळख वाढविली होती. १५ जून रोजी ...

Fake husband exposed in Honeytrap | हनीट्रॅपमधील बनावट पतीचा पर्दाफाश

हनीट्रॅपमधील बनावट पतीचा पर्दाफाश

या गुन्ह्यात अटक असलेली शीतल किरण खर्डे हिने फसवणुकीच्या उद्देशानेच पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याशी ओळख वाढविली होती. १५ जून रोजी सायंकाळी फिर्यादीस शीतल हिने तिच्या वडगाव गुप्ता येथील घरी बोलावून घेतले. तेथे त्याच्याशी जवळीक साधून फोटो काढले. घरात हे दोघे एकत्र असतानाच त्यावेळी अर्जुन वायभासे तेथे आला. अर्जुन हा शीतल हिचा पती आहे आणि दोघांना एकत्र पकडले असे भासविण्यात आले. यावेळी दोघांनी फिर्यादीस मारहाण करून त्याच्याकडील पैसे हिसकावून घेतले. तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून गणेश गिऱ्हे याच्या मध्यस्थीने दीड लाख रुपये घेतले. तपासात वायभासे याचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक केल्याचे या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

Web Title: Fake husband exposed in Honeytrap